शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

विधेयके प्रलंबित ठेवू शकत नाहीत राज्यपाल - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 06:43 IST

अडवणूक का करायची? : सुप्रीम कोर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यपालांना कोणतीही कार्यवाही न करता अनिश्चित काळासाठी विधेयके प्रलंबित ठेवण्याचे स्वातंत्र्य असू शकत नाही, राज्याच्या निवडून न आलेल्या प्रमुखाला घटनात्मक अधिकार दिलेले आहेत, परंतु त्याचा वापर सामान्य स्थितीत राज्य विधानमंडळांद्वारे कायदा बनवण्यात अडथळा आणण्यासाठी केला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यपालांच्या या वृत्तीमुळे संसदीय शासन पद्धतीवर आधारित घटनात्मक लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनुसार नियमितपणे निवडून आलेल्या विधिमंडळाचे कामकाज अक्षरशः ठप्प होईल, असे निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.

काय म्हणाले  सर्वोच्च न्यायालय?nपंजाब विधानसभेची सत्रे वैध होती आणि सभापतींनी निर्णय घेतल्यानंतर सत्र अवैध घोषित करण्याचा पर्याय राज्यपालांसमोर नाही. nविधिमंडळाच्या अधिवेशनावर शंका घेण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीला गंभीर धोका ठरेल. nमंत्रिमंडळातील सरकारचे सदस्य उत्तरदायी असतात आणि ते विधिमंडळाच्या छाननीच्या अधीन असतात. राष्ट्रपतींकडून नियुक्त राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात.

राज्यपालांना निर्णय घेण्याचे निर्देशसर्वोच्च न्यायालयाने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना १९ आणि २० जून रोजी झालेल्या संवैधानिकदृष्ट्या वैध अधिवेशनादरम्यान विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्ली