शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल तकाकबाबतचे विधेयक संविधान विरोधी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 17:29 IST

ट्रिपल तलाकबाबत केंद्र सरकारचे प्रस्तावित विधेयक हे संविधान विरोधी असल्चाचा आरोप करत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या विधेयकाला विरोध केला आहे. तसेच हे विधेयक मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

लखनौ - ट्रिपल तलाकबाबत केंद्र सरकारचे प्रस्तावित विधेयक हे संविधान विरोधी असल्चाचा आरोप करत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या विधेयकाला विरोध केला आहे. तसेच हे विधेयक मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. केंद्र सरकारचे हे प्रस्तावित विधेयक अनेक कुटुंबे उदध्वस्त करेल, अशी भीती व्यक्त करत पर्सनल लॉ बोर्डाने या विधेयकाला संविधान विरोधी, शरियत विरोधी आणि गुन्हेगारी कृत्य ठरवले आहे.  ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या रविवारी लखनौ येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर अध्यक्ष सज्जाद नोमानी म्हणाले की, "हे विधेयक तयार करताना कुठलीही वैध प्रक्रिया विचारात घेण्यात आलेली नाही. तसेच कुणाशीची चर्चाही करण्यात आलेली नाही. तसेच त्यांचे मतही विचारात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे  आम्ही पंतप्रधानांना आवाहन करतो, की त्यांनी हे विधेयक मागे घ्यावे." हे विधेयक शरियतच्या विरोधात आहे. त्यामुळे प्रत्येक स्तरावर केंद्र सरकारच्या या प्रस्तावित विधेयकाचा विरोध होणार आहे. केंद्राने हे विधेयक बनवताना आमचे मत जाणून घेतले पाहिजे होती. तसेच या विधेयकातील तीन वर्षांच्या कैदेच्या तरतुदीमुळे बोर्डाने या विधेयकाची संभावना  गुन्हेगारी कायदा आणि महिलाविरोधी कायदा अशी केली आहे. हे विधेयक महिलांच्या स्वातंत्र्यामध्ये ढवळाढवळ करणारे असल्याचे म्हटले आहे.     

 ट्रिपल तलाक विरोधात नव्या कायद्याचा मसुदा केंद्र सरकारने तयार केला असून या विधेयकाला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. कायद्याचं स्वरूप देण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात या विधेयकाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीनंतर याबाबत कायदा अस्तित्वात येईल. हा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पत्नीला तोंडी तलाक देण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल होऊन त्याला तुरुंगवास भोगावा लागणार आहे. कारण ट्रिपल तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद यामध्ये आहे.सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत केंद्र सरकारला कायदा बनवण्यास कोर्टाने सांगितले होते. कोर्टाच्या सूचनेनुसार आता केंद्र सरकारने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे.  गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एका मंत्री गटाने हा मसुदा तयार केला आहे. यामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद आणि विधी राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांचा समावेश आहे. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकMuslimमुस्लीमIndiaभारत