शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाचे अधिकार राज्यांना देणारे विधेयक आज संसदेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 06:59 IST

reservation: अन्य मागासवर्गीयांची (ओबीसी) यादी तयार करण्याचे व त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना देण्याकरिता मोदी सरकार संसदेच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी एक विधेयक मंजुरीसाठी मांडण्याची शक्यता आहे.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : अन्य मागासवर्गीयांची (ओबीसी) यादी तयार करण्याचे व त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना देण्याकरिता मोदी सरकार संसदेच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी एक विधेयक मंजुरीसाठी मांडण्याची शक्यता आहे. ते संमत झाल्यास मराठा समुदायाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या समुदायाला महाराष्ट्र सरकारने देऊ केलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात रद्द केले होते.हे विधेयक संमत झाल्यास न्यायालयीन निकाल मराठा आरक्षण देण्याच्या आड येऊ शकणार नाही असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. या विधेयकाच्या मसुद्यावर अंतिम हात फिरविण्यात केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण, कायदा तसेच संसदीय कामकाज खात्याचे वरिष्ठ अधिकारी गर्क आहेत. सूत्रांनी सांगितले की, अन्य मागासवर्गीयांना आरक्षण देण्याबाबतचे अधिकार राज्यांना देणारे हे विधेयक संसदेत मांडण्यास राष्ट्रपतींनीही संमती दिली आहे.मराठा समुदायाला महाराष्ट्र सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने रद्द केले होते. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये असा निकाल १९९२ साली मंडल आयोगाबद्दलच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. हा निकाल फेरविचारासाठी विस्तारित खंडपीठाकडे पाठविण्यास न्यायालयाने नकार दिला होता. बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्येही अन्य मागासवर्गीयांची यादी बनविण्याचे, त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार मिळावेत यासाठी आग्रही आहेत. असे अधिकार  राज्यांना मिळावेत यासाठी घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिली होती. 

कुरघोडीचा प्रयत्न- अन्य मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देणारे विधेयक लवकरात लवकर संसदेत मंजूर करून केंद्र सरकार विरोधकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे. - पेगॅससपासून अनेक मुद्द्यांवर विरोधक संसदेच्या कामकाजात अडथळे आणत आहेत. मात्र, ते या विधेयकाला विरोध करू शकणार नाहीत याची सरकारला खात्री वाटते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणParliamentसंसद