सीबीआय प्रमुखांची नियुक्ती विधेयक; विरोधक आक्रमक
By Admin | Updated: November 26, 2014 02:47 IST2014-11-26T02:47:17+5:302014-11-26T02:47:17+5:30
सीबीआयप्रमुखाची नियुक्ती अवैध मानली जाणार नाही, अशी सुधारणा सुचविणा:या दुरुस्ती विधेयकावरून विरोधकांनी मंगळवारी लोकसभेत जोरदार गोंधळ घातला़

सीबीआय प्रमुखांची नियुक्ती विधेयक; विरोधक आक्रमक
नवी दिल्ली : सीबीआयप्रमुखाची निवड करणा:या समितीच्या तीन सदस्यांपैकी केवळ एक गैरहजर आहे म्हणून सीबीआयप्रमुखाची नियुक्ती अवैध मानली जाणार नाही, अशी सुधारणा सुचविणा:या दुरुस्ती विधेयकावरून विरोधकांनी मंगळवारी लोकसभेत जोरदार गोंधळ घातला़ विरोधकांचा गोंधळ आणि काँग्रेससह काही विरोधी पक्षांचा सभात्याग यातच या विधेयकावर चर्चा केली गेली़ यावेळी हे दुरुस्ती विधेयक आणण्यामागे कुठलाही छुपा इरादा नसल्याचे सरकारने स्पष्ट केल़े
कार्मिक व प्रशिक्षण राज्यमंत्री जितेन्द्र सिंह यांनी ‘दिल्ली विशेष पोलीस स्थापना दुरुस्ती विधेयक 2क्14’ लोकसभेत सादर केल़े तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने केवळ हे दुरुस्ती विधेयक आणले गेले आहे, असे सांगत सिंह यांनी यानिमित्ताने काँग्रेसला लक्ष्य केल़े
(लोकमत न्यूज नेटवर्क)