व्यवसायाच्या वादातून झाले विक्रमचे अपहरण ! पोलिसांची शोध मोहिम : भागिदारच्या पैशातून झाला होता वाद...
By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:57+5:302016-02-01T00:03:57+5:30
लातूर : शहरातील एका २० वर्षीय युवकाचे शुक्रवारी नरबळीसाठी अपहरण केल्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. व्यावसायकि वादातून हे अपहरण झाल्याचे आता समोर आले असून, अपहृत विक्रम पांचाळच्या शोधासाठी नातेवाईकांसह पोलिसांची रविवारीही शोध मोहिम सुरु होती.

व्यवसायाच्या वादातून झाले विक्रमचे अपहरण ! पोलिसांची शोध मोहिम : भागिदारच्या पैशातून झाला होता वाद...
ल तूर : शहरातील एका २० वर्षीय युवकाचे शुक्रवारी नरबळीसाठी अपहरण केल्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. व्यावसायकि वादातून हे अपहरण झाल्याचे आता समोर आले असून, अपहृत विक्रम पांचाळच्या शोधासाठी नातेवाईकांसह पोलिसांची रविवारीही शोध मोहिम सुरु होती.लातूर शहरातील आदर्श कॉलनी- रामनगर येथील आपल्या मामाकडे राहणार्या विक्रम मुरलीधर पांचाळ (२०) याचा भागिदारीत एलईडी आणि सीएफएल बल्ब तयार करण्याचा पटेल नगरात व्यवसाय आहे. कच्चा माल आणून तो पक्का करुन बाजारात बल्बची विक्री केली जाते. या व्यवसायात सोनी कुटुंबातील तिघांचा आणि विक्रम पांचाळ अशी चौघांची भागिदारी आहे. भागिदारीतील मालकी हक्कावरुन विक्रम आणि सोनी कुटुंबियांत एक महिन्यापूर्वी वाद झाला होता. यातून त्याला मारहाणही करण्यात आली होती. या मारहाणीमुळे घाबरलेल्या विक्रमने पंधरा दिवस दुकानाकडे फिरकलेच नाही. यात विक्रमचे नातेवाईक आणि मामा ओमप्रकाश आलमलेकर यांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. शेवटी कच्च्या मालातून तयार झालेल्या वस्तूंच्या विक्रीतून आपले गुंतविलेले पैसे परत देण्याची मागणीही त्याच्या नातेवाईकांनी केली होती. शेवटी याच वादातून आपल्या भाचाचे व्यवसायातील भागिदारांनीच अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्या दिशेनेही पोलिसांचा शोध, तपास सुरु आहे. नरबळीसाठी झालेल्या विक्रमच्या अपहरणाने रविवारी वेगळेच वळण घेतले. चौघांत व्यवसाय...शहरातील पटेल नगरात एलईडी आणि सीएफएल बल्ब तयार करणे, विक्रीचे दुकान-गोदाम आहे. या व्यवसायात चौघांची भागिदारी आहे. विक्रमने दिड लाख तर सोनी कुटुंबियातील तिघांनी चार लाखांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. रॉ मटेरियलचा वापर करुन बल्ब तयार करण्याचे काम येथे केले जाते. याच व्यवसायाच्या वादातून विक्रमचे अपहरण करण्यात आल्याचा संशय विक्रमच्या मामाने व्यक्त केला आहे.संशयामुळे खळबळ...लातूर शहरातुन शुक्रवारी भरदिवसा विक्रम पांचाळ या युवकाचा नरबळी देण्यासाठीच अपहरण करण्यात आला असल्याच्या संशयामुळे खळबळ उडाली. आपले अपहरण करण्यात आले असून, पाउस पडावा यासाठी आपला नरबळी देण्यात येणार असल्याचा मॅसेस विक्रमने आपल्या मामाच्या मोबाईलवर टाकला. परिणामी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांची शोध मोहिम...प्रसाद सगरने आपले अपहरण केले असल्याचा मॅसेज विक्रम पांचाळने आपल्या मामाच्या मोबाईलवर पाठविल्यानंतर, रविवारी प्रसाद सगर आणि व्यावसायीक भागिदार असलेल्या सोनी कुटुंबांची पोलिसांनी चौकशी केली. मात्र प्रसाद सगर आणि विक्रम पांचाळची साधी ओळखही नसल्याची मोहिती लातूर ग्रामीण पोलिसांनी दिली. परिणामी विक्रमचे अपहरण नेमके कोणी केले, याचे गुढ मात्र वाढले आहे.