बाईकला लावली आग

By Admin | Updated: August 10, 2015 23:28 IST2015-08-10T23:28:26+5:302015-08-10T23:28:26+5:30

बाईकला लावली आग

Bikla lavala fire | बाईकला लावली आग

बाईकला लावली आग

ईकला लावली आग
नागपूर : कोतवाली आणि गणेशपेठ येथे असामाजिक तत्वांनी दोन बाईकला आग लावली. नवी शुक्रवारी येथील मयूर माने यांनी शनिवारी रात्री घरासमोर बाईक ठेवली होती. कुणीतरी त्यांच्या बाईकला आग लावली. त्याचप्रकारे तेलीपुरा नवी शुक्रवारी येथील दुर्गेश तलमले यांच्या घरासंोर ठेवलेल्या बाईकलाही आग लावण्यात आली. कोतवाली व गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महिलेचा विनयभंग
नागपूर : इमामवाडा पोलिसांनी महिलेचा विनयभंग करणारा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुलशन खोब्रागडे (३०) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने रविवारी रात्री ११.४५ वाजता महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला होता.

पायऱ्यांवरून पडून महिलेसह दोघांचा मृत्यू
नागपूर : पायऱ्यांवरून पडून एका महिला मजुरासह वृद्ध व्यक्तिचा मृत्यू झाला. रामदासपेठ मोहरील बिल्डिंग येथील मनोहर मलचंदानी (७२) हे रविवारी सकाळी पहिल्या माळ्यावरील पायऱ्यांवरून खाली पडले. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचप्रकारे साकेतनगरी बेलतरोडी येथील रमेश शेंडेच्या घरी बांधकाम सुरु आहे. रविवारी सकाळी महिला मजूर शिडीवरून विटा घेऊन जात होती. दरम्यान पाय घसरून पडल्याने ती जखमी झाली. सोमवारी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. कल्पना संतोषकुमार कुसराम (२५) रा. बालाघाट असे मृत महिलेचे नाव आहे.

Web Title: Bikla lavala fire