कारला धडक दिल्याने केली बाईकस्वाराची हत्या
By Admin | Updated: April 6, 2015 12:40 IST2015-04-06T10:22:01+5:302015-04-06T12:40:51+5:30
किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन मारामारीत होऊन एका बाईक स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे.

कारला धडक दिल्याने केली बाईकस्वाराची हत्या
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन मारामारीत होऊन एका बाईक स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना राजधानी दिल्लीतील तुर्कमन गेट भागात रविवारी रात्री घडली आहे. शाहनवाझ असे मृत्य व्यक्तीचे नाव असून ते त्यांच्या दोन मुलांसह बाईकवरून घरी जात होते. त्यांच्या बाईकने एका कारला धडक दिल्याचे सांगत मोटारीतील चार लोकांनी शाहनवाझ यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले आणि शाहनवाझ यांना चौघांनी बेदम चोप दिला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या शाहनवाझ यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी निदर्शने करत मारहाण करणा-या चार जणांना अटक करण्याची मागणी केली. सध्या या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान त्या चार जणांना शोधण्यासाठी पोलिस सीसीटीव्डी कॅमे-याचे फूटेज तपासत आहेत.