भरधाव बाईकच्या पेट्रोल टाकीचा भीषण स्फोट, दुर्घटनास्थळाचं दृश्य पाहून उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 03:00 PM2021-09-16T15:00:19+5:302021-09-16T15:05:31+5:30

जलालाबाद येथील पंजाब नॅशनल बँकजवळ ही दुर्घटना घडली. हा स्फोट खूप भीषण होता. यात मृत झालेला व्यक्ती फिरोजपूर येथे राहणारा होता.

A biker was seriously injured after a blast in his bike's fuel tank in Jalalabad last evening | भरधाव बाईकच्या पेट्रोल टाकीचा भीषण स्फोट, दुर्घटनास्थळाचं दृश्य पाहून उडेल थरकाप

भरधाव बाईकच्या पेट्रोल टाकीचा भीषण स्फोट, दुर्घटनास्थळाचं दृश्य पाहून उडेल थरकाप

Next
ठळक मुद्देपोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं वय २२ वर्ष होतं. तो नातेवाईकांच्या येथून घरी परतत होता. दुचाकीच्या पेट्रोल टाकीत आग लागली याची चौकशी करत आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यांच्या रिपोर्टनंतरच स्पष्ट काय ते कळेल.

जलालाबाद – पंजाबमध्ये जलालाबाद इथं बुधवारी एक भीषण दुर्घटना घडली. ज्यात बाईकसह चालवणाऱ्या व्यक्तीच्या चिंधड्या उडाल्या. या घटनेनंतर पीडितांना हॉस्पिटलला नेले असता तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पेट्रोलच्या टाकीत हा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु अद्याप यामागचं कारण स्पष्ट झालं नाही. बाईकमधील पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.

जलालाबाद येथील पंजाब नॅशनल बँकजवळ ही दुर्घटना घडली. हा स्फोट खूप भीषण होता. यात मृत झालेला व्यक्ती फिरोजपूर येथे राहणारा होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं वय २२ वर्ष होतं. तो नातेवाईकांच्या येथून घरी परतत होता. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी हा बॉम्बब्लास्ट आहे की, दुचाकीच्या पेट्रोल टाकीत आग लागली याची चौकशी करत आहेत. पण ही दुर्घटना इतकी गंभीर होती ती अपघात स्थळाचे दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडेल.

रस्त्यावर पडले होते बाईक तुकडे

दुर्घटनेनंतर काही फोटो समोर आले यात बाईकचे तुकडे झाल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्यावर बाईकचे विविध भाग पडले होते. घटनेनंतर पोलिसांनी आसपासच्या लोकांची चौकशी केली असता दुर्घटनेच्यावेळी बाईकस्वारासोबत दुसरा व्यक्तीही होता. परंतु तो दुसऱ्या बाईकवर होता. दुर्घटनेनंतर तो तिथून गायब झाल्याचं पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे एका स्फोटाप्रमाणे वाटत आहे. पेट्रोल टाकीला आग लागली आणि संपूर्ण बाईक विळख्यात सापडली. सध्या या दुर्घटनेबाबत काहीही सांगता येत नाही. फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यांच्या रिपोर्टनंतरच स्पष्ट काय ते कळेल.

दरम्यान, अमृतसह येथून काही दहशतवाद्यांना पकडलं आहे. जे पाहता पंजाबमध्ये हायअलर्ट घोषित केला आहे. तपास यंत्रणा या स्फोटाकडे गंभीरतेने पाहत आहेत. दुचाकीस्वार हा फिरोजपूर येथील चांदीवाला गावातील रहिवासी आहे. या गावाच्या दोन्ही बाजूस भारत-पाकिस्तान सीमा आहे. त्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून नेमकं या स्फोटामागे काय कारण आहे हे जाणून घ्यायचं प्रयत्न करत आहेत.

Read in English

Web Title: A biker was seriously injured after a blast in his bike's fuel tank in Jalalabad last evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.