शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 09:13 IST

Bijnor Temple, Free Liquor Announcement: उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये शिवमंदिराच्या लाऊडस्पीकरवरून गावकऱ्यांसाठी एक तास 'मदिरा दान' (फ्री दारू) वाटपाची घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे मोठा वाद; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश.

बिजनौर : धार्मिक स्थळाचा वापर सार्वजनिक घोषणांसाठी होत असताना, उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका शिवमंदिरातून गावकऱ्यांना एक तास 'फ्री दारू' वाटप करण्याची घोषणा करण्यात आल्याने मोठा गदारोळ उडाला आहे. 

नजीबाबाद परिसरातील आलमपूरगंगा उर्फ गंगावाला टांकली या ग्रामपंचायतीतील शिवमंदिराच्या लाऊडस्पीकरवरून बुधवारी संध्याकाळी एक घोषणा करण्यात आली. या घोषणेमध्ये, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत छितावर गावातील देशी दारूचा ठेका केवळ गावकऱ्यांसाठी 'फ्री' असेल, असे सांगण्यात आले. म्हणजेच, या वेळेत कोणताही ग्रामीण दारूच्या ठेक्यावरून पैसे न देता दारू घेऊ शकतो, असे सांगण्यात आले होते. या घोषणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंध?स्थानिक नागरिक या घोषणेचा संबंध आगामी ग्रामपंचायत निवडणुकीशी जोडत आहेत. निवडणुकीची घोषणा झालेली नसतानाही, इच्छुक उमेदवार गावांमध्ये आतापासूनच मेजवान्यांचे आयोजन करत असल्याची चर्चा आहे. दारू वाटपाची ही घोषणा याच प्रयत्नांचा भाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

ही घोषणा कोणी केली?

एका गावकऱ्याच्या सांगण्यावरून ही घोषणा करण्यात आली होती, असे मंदिराचे सेवादार धर्मवीर सिंह यांनी सांगितले. आता पुजारी धर्मवीर सिंह यांनी माफीनामा लिहून दिला असल्याचे पोलीस अधिकारी पुष्पा देवी यांनी सांगितले आहे. 

प्रशासनाने घेतले गंभीर दखलनजीबाबादचे एसडीएम शैलेंद्र कुमार सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "मंदिरातून फ्री दारू वाटपाची घोषणा करणे हा धार्मिक भावनांशी खेळ आहे," असे त्यांनी म्हटले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि दोषींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Temple Announcement: Free Liquor Distribution Sparks Outrage in Uttar Pradesh

Web Summary : A Uttar Pradesh temple announced free liquor distribution, sparking controversy. Villagers suspect election connections. Police are investigating the incident after the announcement from the temple loudspeaker. Officials condemn the act as religiously insensitive, promising legal action against those responsible for the incident.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशTempleमंदिर