शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:32 IST

वैद्यकीय रुग्णालयात डायलेसिस दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय सरफराज डायलेसिससाठी आला, ते सुरू झालं पण मध्येच लाईट गेली.

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील वैद्यकीय रुग्णालयात डायलेसिस दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय सरफराज डायलेसिससाठी आला, ते सुरू झालं पण मध्येच लाईट गेली. सरफराजला देण्यात येणारं अर्ध रक्त आधीच मशीनमध्ये होतं. सरफराजची आई कर्मचाऱ्यांसमोर विनवणी करत राहिली, मुलाला अस्वस्थ वाटत आहे, तो मरेल, जनरेटर चालू करा, परंतु कर्मचाऱ्यांनी डिझेल नसल्याचं सांगत नकार दिला आणि तरुणाचा मृत्यू झाला.

वैद्यकीय रुग्णालयाच्या डायलेसिस विभागात जेव्हा सरफराजची प्रकृती बिघडली, तेव्हा सलमा तेथे तपासणी करणाऱ्या सीडीओ पूर्णा बोरा यांच्याकडे धावली. त्यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सीपीआरसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत सरफराजचा मृत्यू झाला होता. आईच्या डोळ्यासमोरच लेकाचा तडफडून मृत्यू झाला. पूर्णा बोरा यांनाही धक्का बसला. सलमा यांनी रडत रडत तिच्या कुटुंबातील सदस्यांना फोन केला आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती दिली.

सलमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा बरा होता आणि रुग्णालयात तो स्वतःहून आला आहे. एक वर्षापासून आजारी होता. पाच वेळा डायलेसिस केलं होतं. डायलेसिस सुरू झाल्यावर दोनदा लाईट गेली. तिसऱ्यांदा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लाईट गेली. याच दरम्यान सरफराजचा मृत्यू झाला. डायलेसिसचं काम संजीवनी प्रायव्हेट लिमिटेडकडे सोपवण्यात आलं आहे. यासाठी सरकार प्रति रुग्ण सुमारे १३०० रुपये देते. येथे दररोज २० रुग्णांचे डायलिसिस केले जाते. अशा परिस्थितीत कंपनीला एका महिन्यात १० लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जात आहेत. त्याच वेळी, एका वर्षात कंपनीला सुमारे एक कोटी रुपये देण्यात आले.

जिल्हा रुग्णालय बिजनोरमध्ये कार्यरत असलेले डायलेसिस सेंटर पीपी मोडवर एका खासगी एजन्सीला देण्यात आलं आहे, जे सेंटर सुरू आहेत, त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. स्वच्छतेचा अभाव, डॉक्टरांचा अभाव, टेक्निशियनचा अभाव, लाईट गेल्यावर जनरेटरसाठी डिझेलचा अभाव, ज्यामुळे अशा घटना घडत असल्याचं म्हटलं जात आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटलdialysisडायलिसिस