शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा कोरोना जागृती, रात्री दारूची तस्करी; भाजप कार्यकर्ते वापरत असलेली गाडी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 11:00 IST

कोरोना जनजागृतीच्या कामासाठी भाजपकडून वापरलं जाणारं वाहन पोलिसांकडून जप्त

समस्तीपूर: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वच पातळ्यांवरून जनजागृती करण्याचं काम सुरू आहे. बिहारच्या समस्तीपूरमधल्या मोहिमउद्दीननगर येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एका भाड्याच्या गाडीतून कोरोनाबद्दल जनजागृतीचं काम करायचे. मंगळवारी रात्री पोलिसांनी याच गाडीतून दारू जप्त केली आहे. ही गाडी हनुमाननगरहून आरबीएस महाविद्यालयाकडे जात असताना पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईदरम्यान ५० कार्टन विदेशी मद्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी गाडी मालकाला अटक केली आहे.हनुमान नगरात राहणाऱ्या सुरेंद्र कुमार राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी सुरेंद्र कुमारच गाडी चालवत होता. तोच गाडीचा मालक आहे. बिहारमध्ये दारूबंदी आहे. रात्री गाडीतून तस्कर दारू उतरवत असताना गस्तीवर असणारं पोलीस पथक तिथे पोहोचलं. पोलिसांना पाहताच तस्कर पळून गेले. मात्र चालक सुंरेंद्र कुमारला पोलिसांनी अटक केली. 'मी रात्री घरी झोपलो होतो. त्यावेळी हनुमाननगरमध्ये राहणारे अमरजीत कुमार, राकेश कुमार राऊत यांच्यासह चार जण माझ्या घरी आले. भुसा आणायचा असल्याचं सांगून ते मला घरातून घेऊन गेले. त्यांनी जबरदस्तीनं माझ्या गाडीत दारू ठेवली,' असं सुरेंद्र कुमारनं पोलिसांना सांगितलं.माझ्यासोबत गाडीत असलेले लोक ठरलेल्या ठिकाणीच दारू उतरवत होते. पण तितक्यात तिथे पोलीस आले. त्यामुळे त्यांनी तिथून पळ काढला, अशी माहिती कुमारनं पोलिसांना दिली. पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीचा वापर दोन दिवसांपासून भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. कोरोनाबद्दल जनजागृती करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे कार्यकर्ते या गाडीचा वापर करत आहेत. त्यामुळे गाडी ताब्यात घेतल्यानंतर भाजपचे कार्यकर्तेच दारू तस्करी करत असल्याचा लोकांचा समज झाला. या गाडीवर भाजपचा बॅनर असल्यानं पोलिसांकडून कारवाई होणार नाही, हा विचार करून तस्करांनी गाडीचा वापर दारूच्या तस्करीसाठी केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या