शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

...म्हणून कांद्याचा हार घालून आमदार पोहोचले थेट विधानसभेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:09 IST

अनेक नेतेमंडळी कांद्याच्या दरवाढीला विरोध करण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवताना दिसत आहेत.

बिहार : सध्या देशात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहे. स्थानिक भाजी मार्केटमध्ये 100 रुपये प्रति किलो दराने कांदा विकला जात आहे. काद्यांच्या वाढत्या किमतीमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहे. तसेच, अनेक नेतेमंडळी कांद्याच्या दरवाढीला विरोध करण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवताना दिसत आहेत. यातच राष्ट्रीय जनता दलाचे आमदार शिवचंद्र राम यांनी कांद्याने गुंफलेल्या हार घालून बिहार विधानसभेत दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे  कांदा दरवाढीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काद्यांचा हार घालून आल्याचे शिवचंद्र राम यांनी सांगितले.

बिहार विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. यावेळी शिवचंद्र राम यांनी आपल्या गळ्यात काद्यांचा हार घालून वाढत्या महागाईचा विरोध केला. तसेच, यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिवचंद्र राम म्हणाले, "कांदा सर्वांच्या जेवणाच्या थाळीतून गायब झाला आहे. नितीश कुमार आणि कृषीमंत्री (प्रेम कुमार) कृषी रोडमॅपवरून भाषण करतात. कृषी रोडमॅपच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करण्यात आले. तरीही कांद्याच्या किंमती वाढल्या." याचबरोबर, काद्यांचा हार घालून विधानसभेत गेल्यावरच मुख्यमंत्री आम्हाला पाहतील आणि आम्ही कशाप्रकारे कांदा दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे, ते त्यांना सांगू, असेही शिवचंद्र राम यांनी सांगितले.

दरम्यान, राजधानी पटनामध्ये 80 रुपये प्रति किलो कांदा विकला जात आहे. दुकानदारांचे म्हणणे आहे की, आधी एक-दोन दिवसात 30-50 किलो कांदा विकाला जात होता. मात्र सध्या त्यांना 10 किलो कांदा विकणे कठीण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत कांद्याची किंमत 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, कांदा व्यापाऱ्यांनी 15 डिसेंबरपर्यंत कांद्याच्या दरात घट होणार नसल्याची शक्यता वर्तविली आहे. 

टॅग्स :onionकांदाBiharबिहार