आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीत बिहारमध्ये विरोधी पक्षांच्या महाआघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. येथील राज्यसभेच्या पाच पैकी पाचही जागांवर केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने बाजी मारली आहे. या निवडणुकीसाठी आज सकाळपासून सुरू असलेल्या मतदानाला महाआघाडीमधील घटकपक्षांच्या चार आमदारांनी दांडी मारल्याने विरोधी पक्षांच्या उमेदवाराचं गणित बिघडलं आणि एनडीएच्या पाचव्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली. यात विधानसभेतील संख्याबळानुसार एनडीएचे चार तर महाआघाडीचा एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता होती. मात्र एनडीएने येथे पाचवा उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत आणली. तसेच आज झालेल्या मतदानाला महाआघाडीमधील घटक पक्षांचे चार आमदार अनुपस्थित राहिल्याने महाआघाडीचं गणित बिघडलं. तसेच एनडीएचे नितीश कुमार, नितीन नवीन, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाहा या चार उमेदवारांसह शिवेश राम हे पाचवे उमेदवारही विजयी झाले. तर महाआघाडीचे अमरेंद्र सिंह धारी हे पराभूत झाले.
बिहारमधील राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळी पाच वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात विधानसभेतील एकूण २४३ सदस्यांपैकी एनडीएच्या २०२ सदस्यांनी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान केलं. तर महाआघाडीच्या केवळ ३७ आमदारांनी निर्धारित वेळेपर्यंत मतजानाचा हक्क बजावला. महाआघाडीचे ४ आमदार मतदानासाठी विधानसभेत पोहोचलेच नाहीत, त्यामुळे महाआघाडीच्या उमेदवाराचा पराभव निश्चित झाला आणि अखेरीस तसाच निकाल लागला.
Web Summary : Bihar Rajya Sabha elections saw NDA win all five seats, dealing a blow to Mahagathbandhan. Four Mahagathbandhan MLAs abstained from voting, disrupting opposition's calculations and ensuring NDA's victory.
Web Summary : बिहार राज्यसभा चुनाव में एनडीए ने सभी पाँच सीटें जीतीं, जिससे महागठबंधन को झटका लगा। महागठबंधन के चार विधायकों ने मतदान नहीं किया, जिससे विपक्ष की गणना बाधित हुई और एनडीए की जीत सुनिश्चित हुई।