शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या राजकारणात खळबळ! विधानसभा अध्यक्षांसह ४२ आमदारांची आमदारकी धोक्यात; पाटणा हायकोर्टाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:42 IST

Bihar MLA Court Notice: बिहार विधानसभा अध्यक्ष प्रेम कुमार यांच्यासह ४२ आमदारांना पाटणा हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप. भाजप, आरजेडी आणि जेडीयूच्या आमदारांची यादी पहा.

पाटणा: बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्याप्रकरणी पाटणा उच्च न्यायालयानेबिहार विधानसभेचे अध्यक्ष प्रेम कुमार यांच्यासह एकूण ४२ आमदारांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे बिहारमधील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांतील बड्या नेत्यांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान विजयी झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्तेचा तपशील आणि इतर अनिवार्य माहिती लपवल्याचा किंवा चुकीची सादर केल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला आहे. यासंदर्भात न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांची दखल घेत उच्च न्यायालयाने आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा धाडल्या आहेत.

पक्षांनुसार आमदारांची संख्या:न्यायालयाच्या नोटिशीमध्ये सत्ताधारी NDA आणि विरोधी पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे:

भाजप (BJP): २५ आमदार (सर्वात जास्त)

आरजेडी (RJD): ८ आमदार

जेडीयू (JDU): ७ आमदार

काँग्रेस (INC): १ आमदार

सीपीआय (एमएल): १ आमदार

याचिकाकर्त्यांचे ५ मुख्य आरोपनिवडणूक प्रक्रियेत अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन, उमेदवारी अर्जात तांत्रिक त्रुटी असणे, प्रतिज्ञापत्रात महत्त्वाची तथ्ये लपवणे, मालमत्ता किंवा गुन्हेगारी खटल्यांची चुकीची माहिती देणे, चुकीच्या माहितीमुळे निवडणूक निकालावर परिणाम होणे असे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी वेगवेगळ्या तारखांना होणार असून, आमदारांच्या उत्तरावरच त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून असेल. जर दोष सिद्ध झाले, तर या आमदारांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, ज्यामुळे बिहार सरकारला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Politics Shaken: 42 MLAs, Speaker Face Disqualification Notice

Web Summary : Patna High Court issued notices to 42 Bihar MLAs, including the Speaker, over alleged false information in election affidavits. Allegations include concealing criminal records and assets. This could lead to disqualifications and political turmoil.
टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलHigh Courtउच्च न्यायालय