शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या मूर्खपणामुळे ते मुख्यमंत्री झाले', जीतन राम मांझी आणि नितीश कुमारांमध्ये शाब्दिक चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 17:43 IST

बिहार विधानसभेत जात सर्वेक्षण आणि आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यात जोरदार वाद झाला.

Bihar Politics: बिहार विधानसभेत (Bihar Politics) गुरुवारी जात सर्वेक्षण आणि आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा झाली. यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांच्यात जोरदार वाद झाला. 'मांझी माझ्या मूर्खपणामुळेच मुख्यमंत्री बनले', असे वक्तव्य नितीश कुमारांनी केले. 

चर्चेदरम्यान माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी म्हणाले होते की, बिहारची जात जनगणना योग्य प्रकारे झालीये, यावर आमचा विश्वास नाही. डेटा चुकीचा असेल तर त्याचे फायदे योग्य लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत. यावेळी नितीश यांना अचानक राग आला. 'या माणसाला (मांझी) काही कल्पना आहे का. आम्हीच त्यांना मुख्यमंत्री केले. दोन महिन्यातच माझ्या पक्षाचे लोक काढा म्हणू लागले. माझ्या मूर्खपणामुळे ते मुख्यमंत्री झाले,' असे वक्तव्य नितीश कुमारांनी केले.

नितीश पुढे म्हणाले की, त्यांना (मांझी) राज्यपाल व्हायचे आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांकडे बोट दाखवत म्हटले, त्यांना राज्यपाल करा. यानंतर प्रकरण अधिकच चिघळत असल्याचे पाहून सत्ताधारी पक्षातील काही आमदार आणि तेजस्वी यादव यांनी नितीश यांना शांत केले. नंतर विजयकुमार चौधरी यांनीही नितीश यांना रोखले.

नितीश यांनीच मांझींना मुख्यमंत्री केलेजीतन राम मांझी नितीश कुमारांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत जेडीयूचा दारुण पराभव झाला, तेव्हा नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 9 मे 2014 रोजी जितन राम मांझी यांच्याकडे हे पद सोपवले. सुरुवातीला मांझी यांना 'रिमोट कंट्रोल सीएम' म्हटले जायचे, पण हळूहळू मांझी स्वत: मोठे निर्णय घेऊ लागले, यामुळेच नितीशपासून त्यांचे अंतर वाढले. परिस्थिती हळूहळू बिघडली आणि पक्षाने मांझींना राजीनामा देण्यास सांगितले, पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांची जेडीयूमधून हकालपट्टी करण्यात आली. 

75% आरक्षण विधेयक मंजूरविधानसभेत गदारोळ होण्यापूर्वी 75 टक्के आरक्षणाचे विधेयक विनाविरोध मंजूर झाले. बिहारमध्ये सध्या आरक्षणाची मर्यादा 50 ० टक्के आहे. EWS ला यातून वेगळे 10% आरक्षण मिळते. आता नितीश यांच्या प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर झाल्यास 50% आरक्षणाची मर्यादा मोडेल आणि बिहारमध्ये एकूण 65  टक्के आरक्षण मिळेल. याशिवाय EWS साठी 10% आरक्षण वेगळे राहील.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणElectionनिवडणूक