शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Bihar Politics: भाजपपासून 'फारकत' घेतल्यानंतर, नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:12 IST

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर जेडीयू संपवण्यासाठी कट रचण्याचा आरोप केला आहे....

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षासोबतची (BJP) युती तुटल्यानंतर, जनता दल (यू)चे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर जेडीयू संपवण्याचा कट रचण्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर भाजपने नेहमीच अपमानित केले, असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. ते जेडीयू आमदारांच्या बैठकीत बोलत होते.

बैठकीत नितीश कुमार म्हणाले, भाजपने नेहमीच अपमानित केले. जेडीयू संपवण्याचा कट रचण्यात आला. एवढेच नाही, तर भाजपने आपले आमदार खरेदी करण्याचीही तयारी केली होती, असेही धक्कादायक विधान नितीश कुमार यांनी केले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत अनेक आमदार CM नितीश कुमार यांच्यासोबत बोलताना म्हणाले, की सध्याची युती 2020 पासूनच आपल्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. चिराग पासवान यांचे नाव न घेता ते म्हणाले, की ते एक असेच उदाहरण होते. तसेच, जर आता ते सावध झाले नाही, तर हे पक्षाच्या  दृष्टीने योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले.

गेल्या काही काळापासून भाजप आणि नितीश कुमार यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद सुरू होते. नितीश कुमार भाजपची साथ सोडणार अशी चर्चा होती, ती चर्चा आज अखेर खरी ठरली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. आता सीएम नितीश कुमार आरजेडी, डावे आणि काँग्रेस या महाआघाडीसोबत सरकार स्थापन करणार आहेत.

बिहारमध्ये 'ऑपरेशन रिव्हर्स लोटस'भाजप आणि जदयुची युती तुटल्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विटरवरुन भाजपवर निशाणा साधला. बिहारमध्ये सध्या ऑपरेशन रिव्हर्स लोटस सुरू आहे,अशी टीका त्यांनी केली. याशिवाय, लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्या यांनीदेखील, 'राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं लालटेनधारी', अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहार