शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Bihar News: 'गंगाजल'चा सीन जेव्हा खरा होतो, हफ्ता वसुलीसाठी इन्स्पेक्टरने अडवली थेट एसपीची गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:09 IST

Bihar News: सहायक पोलीस निरीक्षकाने हफ्ता वसुलीसाठी थेट एसपीची गाडी अडवली. त्यानंतर झाले असे...

पाटणा: प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या 'गंगाजल' चित्रपटातील दरोगा मंगनी रामचा सीन लोकांच्या मनात घर करुन बसलेला आहे. अजय देवगणची स्टारकास्ट असलेला हा चित्रपट दरोगा मंगनी रामच्या सीनमुळे खूप चर्चेत राहिला. पण रील लाईफमध्ये चर्चेत असलेल्या या सीनने रिअल लाईफ एसपींना धक्का बसला आहे. बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे. 

गंगाजल चित्रपटात बस थांबवून पोलिस अधिकारी हफ्ता वसुली करत असतो, तशाच प्रकारची हफ्ता वसुली करण्यासाठी एका सहाय्यक उपनिरीक्षकाने जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकावरच हात टाकला. वसुली करण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने एसपी साहेबांची गाडी थांबवली. यानंतर एसपींनी त्या पोलिसाला निलंबित केले आणि त्याच्यावर विभागीय कारवाईचे आदेश दिले.

पोलीस अधिकारी निलंबितया प्रकरणाची माहिती देताना शेखपुराचे एसपी कार्तिकेय शर्मा यांनी सांगितले की, कासार पोलिस स्टेशनमध्ये तैनात असिस्टंट सब इन्स्पेक्टर रणवीर प्रसाद यांना अवैध वसुली केल्याप्रकरणी तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. हा पोलीस अधिकारी चंडी पहाड येथून दगड आणि इतर माल वाहून नेणाऱ्या वाहनांकडून सातत्याने अवैध वसुली करत असल्याचा दावाही एसपींनी केला.

एसपी सामान्य वेषात घटनास्थळी गेलेरणवीर प्रसाद यांच्याबद्दल लोकांनी एसपींकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार, रणवीर प्रसाद रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वारांकडून पन्ना-शंभर रुपये घेत असे. या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला पकडण्यासाठी एसपी कार्तिकेय शर्मा स्वत: सामान्य माणसाच्या वेशभूषेत घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला रंगेहात पकडले.

एसपींची अधिकाऱ्यांविरोधात कारवाईमिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षकाने एसपींना वसुलीसाठी हात देऊन थांबवले. एसपी जवळ येताच त्याला धक्का बसला. पण तोपर्यंत एसपींनी त्याची सगळी कृत्ये स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. यानंतर तात्काळ प्रभावाने सहायक निरीक्षकाला निलंबित करण्यात आले. वाहनांकडून अवैध वसुली केल्याप्रकरणी आठ पोलिसांना यापूर्वी एसपींनी निलंबित केले होते. हे आठ पोलीस शेखपुरा आणि चेहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित होते. आजकाल, एसपी रात्री उशिरा रस्त्यावर उतरुन पोलिसांना रंगेहात पकडत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसBiharबिहार