बिहार बातमी / बॉक्स मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा पण अंमलजावणीवर बंदी
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:22+5:302015-02-18T23:54:22+5:30
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखणार्या पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी आपला पूर्वीचा आदेश पलटवत मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा दिली़ मात्र सोबतच या निर्णयाची अंमलबजावणी २१ फेबु्रवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला़

बिहार बातमी / बॉक्स मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा पण अंमलजावणीवर बंदी
प टणा : बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखणार्या पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी आपला पूर्वीचा आदेश पलटवत मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा दिली़ मात्र सोबतच या निर्णयाची अंमलबजावणी २१ फेबु्रवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला़गत १६ फेबु्रवारीला पाटणा उच्च न्यायालयाचे न्या़ इक्बाल अहमद अन्सारी आणि न्या़ समरेन्द्र प्रताप सिंह यांच्या खंडपीठाने मांझी सरकारला मोठा दणका देत, बहुमत सिद्ध करण्यापूर्वी कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखले होते़ मात्र न्या़एल़ नरसिम्हा रेड्डी आणि न्या़ विकास जैन यांनी मात्र हा निर्णय बदलत, मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची परवानगी दिली़