शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सुनेने केस काळे करण्यासाठी तयार करून ठेवलेले हेअर डाय प्यायल्याने सासूचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 22:27 IST

यावेळी डॉक्टरांनी तेथे उपस्थित असलेल्या लोकांना, असे केमिकल मुलं आणि वृद्ध लोकांपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

गोपालगंज - सुनेने पांढरे केस काळे करण्यासाठी ग्लासमध्ये तयार करून ठेवलेली हेअर डाय वृद्ध सासू पाणी समजून प्यायली. हे हेअर डाय केमिकल पोटाच जाताच त्यांची प्रकृती खालावली आणि त्या बेशुद्ध झाल्या. यानंतर कुटुंबियांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. येथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील मांझा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भैसहीं गावात घडली. लालमती देवी, असे मृत महिलेचे नाव आहे. (Bihar Mother-in-law dies after drinking hair dye in gopalganj)

डाय तयार करून दुसरे काम करण्यासाठी गेली होती सून - एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस उपनिरीक्षक पंकज चौधरी यांनी सांगितले, की चौकशीदरम्यान संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी म्हटले आहे, की मृत सासूच्या सुनेने पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारातून हेअर डाय आणले होते. यानंतर सोमवारी सकाळी ती एका ग्लासमध्ये डाय तयार करून दुसरे काम करण्यासाठी गेली. याच दरम्यान महिलेची सासू लालमती देवी यांनी पाणी प्यायण्यासाठी ग्लास घेतला आणि त्यातील पातळ पदार्थ पाणी समजून घेतला.

प्रेमप्रकरण न संपवल्याने सख्ख्या भावाने १५ वर्षाच्या बहिणीची गळा दाबून केली हत्या 

कुटुंबियांनी सांगितल्यानुसार, लालमती देवी यांना डोळ्यांनी स्पष्ट दिसत नव्हते. यामुळे त्यांना ग्लासमध्ये हेअर डाय असल्याचे समजले नाही. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर डॉ.सनाउल मुस्तफा आणि डॉ.रामाकांत यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, शरिरात विष पसरल्याने त्यांचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन न करताच मतदेह सोपवला - महिलेच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुटुंबियांचा जबाब नोंदवला. केस काळे करण्यासाठी वापले जाणारे डाय प्यायल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर शवविच्छेदन न करताच संबंधित महिलेचा मृतदेह कुटुंबीयांकडे अंत्यसंस्काराराठी सोपवण्यात आला. तसेच, यावेळी डॉक्टरांनी तेथे उपस्थित असलेल्या लोकांना, असे केमिकल मुलं आणि वृद्ध लोकांपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल