शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणनेसाठी बिहारचे नेते सरसावले; पंतप्रधान मोदींची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 05:51 IST

मुख्यमंत्री नितीशकुमार, तेजस्वी यादव आदींचा सहभाग

नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार १० पक्षांच्या नेत्यांसोबत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. भेटीनंतर शिष्टमंडळ मोदी यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल समाधानी दिसले. 

बैठकीनंतर नितीश कुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “नरेंद्र मोदी यांनी सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मोदी यांनी आमची मागणी नाकारलेली नाही. सरकारमधील एका मंत्र्याने म्हटले होते की, जातनिहाय जनगणना होऊ शकत नाही. त्यानंतर सगळ्या पक्षांत अस्वस्थता होती.” राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव म्हणाले की, “जातनिहाय जनगणनेमुळे शेवटच्या पायरीवर असलेल्या व्यक्तीलाही लाभ होईल. यावर सगळ्या पक्षांचे एकमत आहे. मंडल आयोगाच्या आधी देशात किती जाती आहेत, हेच माहीत नव्हते.”

बैठकीत सहभागी भाकपचे (माले) महबूब आलम म्हणाले की, “दलित, मागासलेल्यांना राखीव जागांची ५० टक्के मर्यादा आहे; पण लोकसंख्येत हा वर्ग ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्हणून दलित-मागास समुदायाची जनगणना होईल तेव्हाच राखीव जागा व सरकारी योजनांचा खराखुरा लाभ त्यांना मिळेल.”

ओबीसीची जनगणना शक्य n    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बब्बन तायवाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, “ज्या मुद्द्यावर बिहारमधील सर्व पक्ष पुढे आले त्यावर यंदाच्या जनगणनेत जातींनाही समाविष्ट केले जाईल, अशी आशा आहे.n    ओबीसी महासंघ गेल्या २५ वर्षांपासून ही मागणी करीत आहे. सरकारची इच्छा असेल तर २०२१ मध्ये हे शक्य आहे. म्हणून एससी, एसटीसोबत ओबीसीचा एक कॉलम जोडला जावा. जनगणना डिजिटल माध्यमातूनच होणार असल्यामुळे काही अडचण येणार नाही.”n    संसदेने संमत केलेल्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास जातींची आपली यादी बनवण्याचा अधिकार मिळाला आहे. 

रूपरेषा तयारn    संसद अधिवेशनात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत फक्त अनुसूचित जाती आणि जनजातींचीच मोजणी करणार, असे म्हटले होते.n    २०२१ च्या जनगणनेची रूपरेषा तयार असली तरी कोरोनामुळे ते काम सुरू झालेले नाही.

या नेत्यांनी घेतली भेटमोदींना भेटलेल्या शिष्टमंडळात १० पक्षांचे ११ नेते सहभागी होते. त्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, जनता दलाचे (संयुक्त) विजय कुमार चौधरी, भाजपचे जनक राम, काँग्रेसचे अजित शर्मा, भाकपचे (माले) महबूब आलम, एआयएमआयएमचे अख्तरुल ईमान, हमचे जितन राम मांझी, व्हीआयपीचे मुकेश साहनी, भाकपचे सूर्यकांत पासवान आणि माकपचे अजय कुमार यांचा समावेश होता.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार