शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

इतरांना पाकिस्तानला पाठवणारे बेगुसरायचे नाव ऐकताच दु:खी झाले, कन्हैया कुमारचा गिरिराज सिंहाना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 11:06 IST

बेगुसराय येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेल्या गिरिराज सिंह यांना प्रतिस्पर्धी उमेदवार कन्हैया कुमार यांनी टोला लगावला आहे.

पाटणा - सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे नवादाऐवजी बेगुसराय येथून उमेदवारी देण्यात आल्याने पक्षनेतृत्वावर नाराज झाले आहे. मात्र बेगुसराय येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेल्या गिरिराज सिंह यांना प्रतिस्पर्धी उमेदवार कन्हैया कुमार यांनी टोला लगावला आहे. इतरांची जबरदस्तीने पाकिस्तानात पाठवणी करणारे पाकिस्तान टूर अँड ट्रॅव्हल्स विभागाचे व्हिसामंत्री नवादा येथून बेगुसरायला जावे लागल्याने दुखावले गेले आहेत,'' अशी टीका कन्हैया कुमार यांनी केली आहे. वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे गिरिराज सिंह हे सध्या नवादा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि लोकजनशक्ती पार्टी यांच्यात झालेल्या जागावाटपामध्ये ही जागा भाजपाच्या मित्रपक्षांकडे गेली होती. दरम्यान, नवादा येथील तिकीट कापून बेगुसराय येथे रवानगी करण्यात आल्याने गिरिराज सिंह हे नाराज होते. तिथे विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्याशी थेट आमना-सामना होणार असल्याने गिरिराज सिंह हे लढण्यास इच्छुक नसल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, बेगुसराय येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेल्या गिरिराज सिंह यांना कन्हैया कुमारने टोला लगावला आहे. इतरांना पाकिस्तानात पाठवणारे पाकिस्तान टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे व्हीसा मंत्री नवादा येथून बेगुसराय येथे रवानगी झाल्याने दुखावले आहेत. बेगुसराय वणक्कम, असे मंत्रीजींनी आताच सांगून टाकले आहे.  

 मात्र नवादाऐवजी बेगुसराय येथून तिकीट दिल्याने गिरिराज सिंह यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये अन्य कुठल्याही खासदाराचा मतदारसंघ बदलण्यात आलेला नाही. मात्र मला न विचारताच माझा मतदारसंघ बदलला गेला. त्यामुळे माझा आत्मसन्मान दुखावला गेला आहे, असे गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारBJPभाजपाBiharबिहारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक