शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये सोन्याबरोबरच बहुमूल्य खनिजांचे भांडार; जमुई अन् औरंगाबाद खनिजांनी ओतप्रोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 07:00 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूर जिल्ह्यात पीरपैंती व कहलगावाच्या परिसरात कोळशाचा ग्रेड जी-१२ उपलब्ध आहे.

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये सोन्याबरोबरच निकेल, क्रोमियम, पोटॅश व कोळशाचे भांडार आहे. जमुईमध्ये सोने, औरंगाबादमध्ये निकेल व क्रोमियम, गयामध्ये पोटॅश व भागलपूरमध्ये कोळशाचे मोठे साठे आहेत. सोन्याचा मोठा साठा सापडल्यामुळे जमुई जिल्हा पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आला आहे. जमुईच्या करमटिया, सोनो या निर्जन ठिकाणी हा सोन्याचा साठा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूर जिल्ह्यात पीरपैंती व कहलगावाच्या परिसरात कोळशाचा ग्रेड जी-१२ उपलब्ध आहे. येथे ८५० दशलक्ष टन कोळसा असल्याचा अंदाज आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने दोन टप्प्यांत केलेल्या सर्वेक्षणात जमुई जिल्ह्याच्या मंजोष गावात मॅग्नेटाइटचे साठे मिळाले आहेत. त्याच्या उत्खननातून संगमरवरासारखा दगड मिळतो.

जमुई जिल्ह्यात दीड दशकापूर्वी सोन्याच्या साठ्याबाबत उत्खनन झाले होते. परंतु सोन्याचे प्रमाण कमी आढळल्याने हा प्रकल्प अर्ध्यावर सोडण्यात आला होता; परंतु आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सोन्याचे उत्खनन स्वस्तात होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमुई जिल्ह्यात करमाटिया, झाझा व सोनो हा परिसर खनिजांनी ओतप्रोत भरलेला आहे. येथे सोन्याच्या शोधासाठी १५-१६ वर्षांपूर्वी कोलकाता येथून एक पथक आले होते. त्यांनी करमटियामध्ये सोन्याचे साठे असल्याचे म्हटले होते. सरकारने १९८२ मध्ये हा परिसर संरक्षित जाहीर केला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी खनन झाले होते. 

टॅग्स :GoldसोनंBiharबिहार