शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय की मत्सालय? पुरामुळे आयसीयूमध्ये पोहोचले मासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 12:54 IST

रुग्णालयातील अनेक विभागांमध्ये गुडघाभर पाणी 

पाटणा : मुसळधार पावसामुळे बिहारची दैना झाली आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. याशिवाय वैद्यकीय सेवेचेही तीन-तेरा वाजले आहेत. राज्यातील महत्त्वाचं रुग्णालय असलेल्या नालंदा वैद्यकीय महाविद्यायात पाणी साचलं आहे. रुग्णालयातील आयसीयूमध्ये तर गुडघाभर पाणी साचल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. आयसीयूमध्ये स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. मात्र या रुग्णालयात आयसीयूमध्ये चक्क मासे पोहताना दिसत आहेत. नालंदा वैद्यकीय महाविद्यायात पूर्व बिहारमधून हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र पावसामुळे या रुग्णालयात पाणी साचल्यानं रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. रुग्णालय 'जलयुक्त' झाल्यानं विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. 'बिहारमधील दुसरं मोठं रुग्णालय असलेल्या एनएमसीएचला मत्सालयाचं स्वरुप आलं आहे. हा इंद्रदेवाचा स्टंट आहे असं संयुक्त जनता दलाकडून जाहीर केलं जाणार नाही, अशी आशा आहे. सरकारची धोरणं 14 वर्षांपासून चुकत आहेत, हे स्वत: देवसुद्धा निदर्शनास आणून देत आहे,' असं तेजस्वी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

नालंदा वैद्यकीय रुग्णालयात दररोज 2 हजार रुग्ण उपचारांसाठी येतात. मात्र सध्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णांना सेवा पुरवणं अवघड जातं आहे. रुग्णालयातील अनेक विभागांमध्ये गुडघाभर पाणी आहे. अनेक मशीन्समध्ये पाणी गेल्यानं त्या बंद आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. आयसीयूमध्ये स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. मात्र या विभागात दूषित पाणी साचलं आहे. त्यामध्ये मासे पोहताना दिसत आहेत. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलBiharबिहारRainपाऊस