शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उपेंद्र कुशवाह यांना मोठा दणका, जेडीयूमध्ये सहभागी होणार शेखर-पासवान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 19:11 IST

बिहारमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी घडत आहेत. आरएलएसपीचे दोन आमदार सुधांशू शेखर आणि ललन पासवान हे नितीश कुमारांच्या पक्षात सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देआरएलएसपीचे दोन आमदार सुधांशू शेखर आणि ललन पासवान हे नितीश कुमारांच्या पक्षात सहभागी होणारसुधांशू शेखर आणि ललन पासवान हे उपेंद्र कुशवाह यांची साथ सोडू शकतात. येत्या मंत्रिमंडळ विस्तारातही या आमदारांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. 

पाटणा- बिहारमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी घडत आहेत. आरएलएसपीचे दोन आमदार सुधांशू शेखर आणि ललन पासवान हे नितीश कुमारांच्या पक्षात सहभागी होणार आहेत. या दोघांनी जर नितीश कुमारांच्या जेडीयूमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी) अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. रविवारी दुपारी हरलाखीचे आरएलएसपी आमदार 7 सर्क्युलर रोडवर दाखल झाले. त्यावेळी त्यांनी जवळपास 45 मिनिटे प्रशांत किशोर यांच्याबरोबर चर्चा केली. तेव्हा नितीश कुमारही तिकडे पोहोचले.सुधांशू शेखर आणि ललन पासवान हे उपेंद्र कुशवाह यांची साथ सोडू शकतात. तर गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील शाब्दिक चकमकीवर लोक जनशक्ती पक्षाच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी दोघांनाही एनडीएच्या मर्यादेची जाणीव करून दिली होती. नितीश कुमार काहीही चुकीचं बोलतील, असं वाटत नसल्याचं चिराग पासवान म्हणाले आहेत. तसेच उपेंद्र कुशवाह यांनाही हा वाद वाढवू नका, असं सांगितलं आहे.उपेंद्र कुशवाह आणि नितीश कुमार यांच्यामध्ये नीच या शब्दावरून वाद झाला होता. तसेच बिहारमधल्या जागावाटपावरूनही दोघांमध्ये मतभेद आहेत. याच दरम्यान राजकारणातले चाणक्य अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी उपेंद्र कुशवाह यांना झटका दिला आहे. तसेच येत्या मंत्रिमंडळ विस्तारातही या आमदारांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोर