शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Flood: बिहारमधील पुरात बळी गेलेल्यांची संख्या २४ वर; ७५ लाख लोकांना जबर फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 06:49 IST

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची (एनडीआरएफ) ३३ पथके राज्यात तैनात

पाटणा : बिहारात आलेल्या पुरातील बळींची संख्या २४ झाली असून, १६ जिल्ह्यांतील ७५ लाखांपेक्षा अधिक लोकांना पुराचा जबर फटका बसला आहे. बिहार सरकारच्या वतीने अधिकृतरीत्या ही माहिती देण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, दरभंगा जिल्ह्यात १0 जण मृत्युमुखी पडले आहेत. मुजफ्फरपूरमध्ये सहा जण, चंपारनमध्ये चार जण, सरनमध्ये दोन जण आणि सिवानमध्ये दोन जण मृत्युमुखी पडले आहेत. पुराचा तडाखा बसलेल्या लोकांची संख्या ७५,0२,६२१ असल्याचे बिहार सरकारच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. पुराच्या पाण्यात बुडाल्याने हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत, तर ६६ जनावरे दगावली आहेत.सूत्रांनी सांगितले की, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची (एनडीआरएफ) ३३ पथके राज्यात तैनात करण्यात आली आहेत. त्यांचे मदत व सुटका कार्य सुरू असून, आतापर्यंत १२,४७९ लोकांना मदत छावण्यांत हलविण्यात आले आहे.शनिवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. भागलपूर, दरभंगा, पुर्णिया, मुंगेर आणि कोसी विभागांचा त्यांनी हवाई दौरा केला. गंडक बॅरेज काळजीपूर्वक हाताळण्याच्या सूचना नितीशकुमार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कोसी नदीच्या पूर्व कूसबंदीचीही त्यांनी पाहणी केली. तत्पूर्वी, सोमवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या पूर आढावा बैठकीला उपस्थिती लावली होती.