Madan Shah Viral Video Bihar Elections: बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, पाटणा येथे एक नाट्यमय प्रकार घडला. मधुबन विधानसभा जागेसाठी तिकीटाचे दावेदार असलेले मदन शाह अचानक आले आणि त्यांनी आंदोलने सुरू केले. त्यामुळे राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या १०, सर्कुलर रोड येथील निवासस्थानाबाहेर गोंधळ उडाला. मदन शाह यांनी निवासस्थानाबाहेरील गेटसमोरच आपला कुर्ता फाडला आणि जमिनीवर पडून हलकल्लोळ केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. आता सोशल मीडियावर हाच व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
मदन शाह यांचा व्हिडीओ झाला व्हायरल
व्हिडिओमध्ये मदन शाह हे राजदच्या तिकिटाच्या बदल्यात त्यांच्याकडे पैसे मागितल्याचा दावा करताना दिसत आहेत. त्यांनी आरोप केला आहे की जेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा पक्षाने त्यांचे तिकीट रद्द केले आणि ते तिकीट पैशाच्या बदल्यात डॉ. संतोष कुशवाहा यांना दिले. पाहा व्हायरल व्हिडीओ-
मदन शाह म्हणाले, "मी वर्षानुवर्षे पक्षासाठी कठोर परिश्रम करत आहे, परंतु पैशाच्या आधारे तिकीट वाटले गेले आहे. पक्षाने समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून पैशाच्या ताकद असलेल्यांना प्राधान्य दिले आहे." त्यांनी राजदचे राज्यसभा खासदार संजय यादव यांच्यावरही गंभीर आरोप केले. संजय यादव यांनी तिकीटे विकली असाही त्यांचा दावा आहे.
लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ
घटनेदरम्यान लालू-राबडी यांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ उडाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मदन शाह यांना तात्काळ घटनास्थळावरून हटवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यादरम्यान, राजदने या घटनेवर कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
Web Summary : Denied a ticket for Bihar's Madhuban seat, RJD's Madan Shah protested dramatically outside Lalu Yadav's residence, tearing his shirt and alleging corruption in ticket allocation. He accused Sanjay Yadav of selling tickets after he refused to pay a bribe, sparking chaos.
Web Summary : बिहार में मधुबन सीट से टिकट न मिलने पर आरजेडी नेता मदन शाह लालू यादव के आवास के बाहर प्रदर्शन किया। उन्होंने कुर्ता फाड़ा और टिकट आवंटन में भ्रष्टाचार का आरोप लगाया। उन्होंने संजय यादव पर रिश्वत लेकर टिकट बेचने का आरोप लगाया, जिससे हंगामा हुआ।