शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Bihar Election 2020: भाजपच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद; पक्षालादेखील कल्पना नसेल

By कुणाल गवाणकर | Published: November 01, 2020 8:30 AM

Bihar Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी नकोशा विक्रमाची नोंद

पाटणा: विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव झंझावाती प्रचारसभा घेत आहेत. राज्यभरात निवडणुकीचा धुराळा उडाला असताना भारतीय जनता पक्षाच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. हा विक्रम बंडखोरांच्या बाबतीतला आहे.विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या मुख्यालय स्तरावरील ४३ जणांना भाजपनं घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये आजी-माजी आमदारांसह प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा विचार केल्यास निलंबितांची संख्या आणखी वाढते. भाजपमध्ये पहिल्यांदाच स्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्याच अधिकृत उमेदवारांविरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जेडीयूची युती आहे. मात्र जवळपास १८ जागांवर भाजपच्या नेत्यांनी जदयूविरोधात दंड थोपटले आहेत. तर जवळपास डझनभर मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी स्वपक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच आव्हान दिलं आहे. भाजपचे अनेक नेते जागावाटपावरून नाराज झाले. भाजप नेते दावा करत असलेले मतदारसंघ जेडीयू आणि अन्य मित्र पक्षांकडे गेल्यानं भाजप नेत्यांनी दुसऱ्या पक्षांची वाट धरत निवडणुकीचं तिकीट मिळवलं.भाजपनं अधिकृत उमेदवार जाहीर करताच जवळपास डझनभर इच्छुकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि स्वपक्षालाच आव्हान दिलं. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपमध्ये यंत्रणा आहे. भाजपच्या नाराज नेत्यांनी इतर पक्षातून किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न केल्यास पक्ष त्यांच्याशी संवाद साधतो. पक्षाचे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. बिहारमध्येही तसा प्रयत्न झाला. पण बंडखोरांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. त्यामुळे सध्याच्या घडीला तीन डझनहून अधिक नेत्यांनी पक्षासमोरच आव्हान उभं केलं आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार