बिहार निवडणूक : दुपारी १२ पर्यंत २६% मतदान
By Admin | Updated: October 28, 2015 12:59 IST2015-10-28T09:29:52+5:302015-10-28T12:59:53+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात दुपारी १२ वाजेपर्यंत २६. ९४ टक्के मतदान झाले आहे.

बिहार निवडणूक : दुपारी १२ पर्यंत २६% मतदान
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 28 - बिहार विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात दुपारी १२ वाजेपर्यंत २६. ९४ टक्के मतदान झाले आहे. आत्तापर्यंत मुख्यमंत्री नीतिश कुमार, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तसेच केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मतदानाचा अधिकार बजावला
बिहार निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात आज पाटणा, वैशाली, सारण, नालंदा, बक्स आणि जोधपूर जिल्ह्यांमधील विधानसभा मतदार संघांसाठी मतदान होत असून १ कोटी ४५ लाख मतदार ८०८ उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत. एकूण ११ हजार १७० मतदान केंद्रांपैकी ६ हजार ७४७ मतदान केंद्रे संवेदनशील केंद्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.