शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:50 IST

Prashant Kishor on Nitish Kumar: 'भाजपला बिहारमध्ये स्वबळावर सत्ता मिळवता येणार नाही.'

Prashant Kishor on Nitish Kumar: जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. या वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर नितीश कुमारबिहारचे मुख्यमंत्री राहणार नाहीत. बिहारमधील ६० टक्क्यांहून अधिक लोकांना बदल हवा आहे, असा दावा पीके यांनी केला आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, 'मी लिहून देतो, नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत. पुढील दोन महिन्यांत चित्र स्पष्ट होईल. राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक लोकांना बदल हवाय. ज्यांनी लोकांना निराश केले, त्यांना ते पुन्हा मतदान करतील का? ते त्यांच्यावर विश्वास ठेवतील का? की ते नवीन पर्याय निवडतील? कोणत्याही परिस्थितीत, नोव्हेंबरनंतर नितीश कुमार निश्चितच मुख्यमंत्री राहणार नाहीत. बिहारला एक नवीन मुख्यमंत्री मिळेल,' असा दावा त्यांनी केला आहे.

मोदी आणि शांहांना नितीश कुमारांची स्थिती माहित नाही का? एनडीटीव्ही मुलाखतीत पीके यांना विचारण्यात आले की, ते इतक्या विश्वासाने हा दावा कसाकाय करू शकतात? यावर त्यांनी नितीश कुमारांच्या 'मानसिक आणि शारीरिक स्थिती'कडे लक्ष वेधले. ते म्हणाले, 'संपूर्ण बिहारला माहित आहे की, नितीश कुमार काहीही करण्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत नाहीत. जो व्यक्ती स्टेजवर शेजारी बसलेल्या पंतप्रधानांचे नाव विसरतो; ज्याला राष्ट्रगीत वाजल्यावर ते राष्ट्रगीत आहे की, कव्वाली हे माहित नाही... ज्याने वर्षभरात माध्यमांना संबोधित केले नाही. जो व्यक्ती स्वतःची काळजी घेण्याच्या स्थितीत नाही. तो बिहारची काळजी कशी घेईल? हे तुम्हाला आणि मला कळत असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कळत नाही का?'

भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्री का केले?'निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपदावर ठेवले आहे. भाजपकडे बिहारमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी किंवा आत्मविश्वास नाही. म्हणूनच, त्यांनी नितीश कुमारांना तिथे बसवले आहे. पण, तुम्ही लिहून ठेवा, यंदा जेडीयूला २५ पेक्षा कमी जागा मिळणार आहेत. निवडणुकीनंतर जेडीयूच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. नितीश कुमार यांचे रेटिंग ६०% वरुन १६-१७% पर्यंत खाली आले आहे. जेडीयूकडे कोणताही केडर नाही. त्यांच्याकडे फक्त नितीश कुमार होते आणि आता तेही गेले आहेत. जर असे झाले नाही, तर मी राजकारण सोडेन,' असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी