Bihar Election 2025 Result: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला पोस्टल व्होटिंगची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मोजणी सुरू करण्यात आली. १० वाजेपर्यंत हाती कल आले, त्यानुसार, एनडीएने जोरदार मुसंडी मारली असून, बहुमताचा आकडा पार केला आहे. तर, महागठबंधन पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्या रणधुमाळीत निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच नशीब आजमावत असलेल्या रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचे तीन उमेदवार आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे.
पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला ३ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. बिहार निवडणुकीत राजकारणी म्हणून उदयास आलेल्या प्रशांत किशोर यांच्यावर सर्वांचे लक्ष आहे. दुसऱ्यांच्या विजयाची गाथा लिहिणारे रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांची बिहार निवडणुकीत काही जादू चालेल का, याकडे अवघ्या देशाच्या राजकारणाचे लक्ष लागलेले आहे.
प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचे उमेदवार कुठे आघाडीवर?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचे तीन उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. करगहर, चनपटिया आणि कुम्हरार या ठिकाणी प्रशांत किशोर यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. करगहर या मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार रितेश पांडे यांनी चांगली आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात एनडीए आणि महाआघाडी व्यतिरिक्त बसपाचे उदय प्रताप सिंह यांच्यात काँटे की टक्कर असल्याचे म्हटले जात आहे. तर, चनपटिया विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे मनिष कश्यप आघाडीवर आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या भाजपाने विद्यमान आमदार उमाकांत सिंह यांना उमेदवारी दिली आहे, तर महाआघाडी समर्थित काँग्रेस उमेदवार अभिषेक रंजन याच जागेवरून निवडणूक लढवत आहेत. तसेच कुम्हारार विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जनसुराज्य पक्षाचे उमेदवार केसी सिन्हा आघाडीवर आहेत.
दरम्यान, १० वाजेपर्यंत जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएत घटक पक्ष असलेल्या भाजपाचे ६७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पक्षाचे ७१ उमेदवार आघाडीवर आहेत. महागठबंधनचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे ६१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे ११ उमेदवार आघाडीवर आहेत. तर २५ पेक्षा अधिक जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.
Web Summary : NDA leads in Bihar 2025 elections. Prashant Kishor's Jan Surajya Party sees three candidates ahead in Karaghar, Chanpatia, and Kumharar constituencies. BJP leads with 67, JDU with 71, RJD with 61, and Congress with 11.
Web Summary : बिहार चुनाव 2025 में एनडीए आगे। प्रशांत किशोर की जन सुराज्य पार्टी के तीन उम्मीदवार कारागार, चनपटिया और कुम्हरार निर्वाचन क्षेत्रों में आगे। भाजपा 67, जदयू 71, राजद 61 और कांग्रेस 11 सीटों पर आगे।