शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

'नितीश कुमारांना उप-पंतप्रधान बनवा', भाजप नेत्याची इच्छा, JDU ने दिली अशी प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:53 IST

Bihar Election 2025 : आगामी बिहार विधानसभा निवडणूक नितीश कुमारांच्या नेतृत्वात लढली जाणार आहे.

Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय हालचालींना वेग येत आहे. सध्या राज्यात नितीश कुमारांच्या नेतृत्वातील NDA चे सरकार असून, यापुढेल निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वात लढणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. अशातच भाज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी नितीश कुमारांबाबत एक मोठी इच्छा व्यक्त केली आहे.

अश्विनी चौबे यांनी नितीश कुमारांना केंद्र सरकारमध्ये जबाबदारी मिळण्याबाबत भाष्य केले आहे. चौबे म्हणाले, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. बिहारमध्ये राम-लक्ष्मणाची जोडी आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत. ते 20 वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे आता त्यांचा दर्जा मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा झाला आहे.

नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी, ही जोडी देशाला दिशा देत आहे. एनडीएचे उद्दिष्ट बिहारमध्ये 2025 च्या निवडणुका जिंकणे आहे. मला वाटते की, नितीश कुमारांना देशाचे उपपंतप्रधान बनवावे ही बिहारची इच्छा आहे, असे अश्विनी चौबे यांनी म्हटले.

जेडीयूची प्रतिक्रियाचौबे यांच्या दाव्यावर जेडीयू नेते अभिषेक झा म्हणाले की, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अश्विनी चौबे यांनी आपले विचार व्यक्त केले, पण बिहारच्या लोकांना नितीश कुमार यांचा चेहरा आवडतो. त्यांनी बिहारच्या लोकांची सेवा केली आहे. बिहारमधील जनता पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर मतदान करेल. बिहार निवडणुकीत नितीश कुमार एनडीएचे नेतृत्व करतील.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा