बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण जबरदस्त तापले आहे. मैदानात असलेले सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आज, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी थेट भारतीय सेन्यासंदर्भातच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “भारतीय सेनेवर देशाच्या केवळ 10 टक्के लोकसंख्येचे नियंत्रण आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते बिहारच्या कुटुम्बा येथे प्रचारसभेत बोलत होते. राहुल यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत, ते “भारतीय सेन्य विरोधी” असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी म्हणाले, “देशातील 90 टक्के जनता दलित, महादलित, मागास, अतिमागास आणि अल्पसंख्याक समाजातील आहे. पण 500 मोठ्या कंपन्या निवडा, तुम्हाला त्या कंपन्यांत या घटकांतील प्रतिनिधी सापडणार नाही. तेथे सर्व मोठ्या पदांवर, नोकऱ्यांवर आणि अगदी सैन्यातही त्याच 10 टक्के लोकसंख्या असलेल्या लोकांचे वर्चस्व आहे. आपल्याला उर्वरित 90 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व कुटेही आढळणार नाही.
मुख्यमंत्री नीतीश कुमारांवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, “बिहारमधील लोक आज देशभरात मजुरी करत आहेत. इमारती, रस्ते, कारखाने तेच बांधतात. नीतीश कुमारांनी बिहारमधून रोजगारच संपवला आहे. मोदी-शहा रिमोटने नीतीश कुमारांचा ‘चॅनल’ बदलतात.”
राहुल गांधींच्या या विधानानंतर, भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी 'एक्स'वरून पलटवार केला आहे. त्यांनी लिहिले, “राहुल गांधी आता आपल्या सशस्त्र दलांनाही जातीच्या आधारे विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय भूदल, नौदल आणि हवाईदल, धर्म, जात, पंथ अथवा वर्गावर नव्हे, तर राष्ट्रप्रथम या तत्वावर उभी आहे. राहुल गांधी आपल्या शूर सैन्याचा द्वेश करतात. ते भारतीय सेन्य विरोधी आहेत."
दरम्यान, राहुल गांधी यांनी आरोप केला की, “भाजपाने नीतीश कुमार यांना कॅप्चर केले आहे आणि आता बिहारमध्ये नीतीश सरकार बनणार नाही.
Web Summary : Rahul Gandhi's claim that 10% control Indian Army ignited controversy in Bihar. BJP criticized his statement as divisive and anti-army. Gandhi also attacked Nitish Kumar, alleging BJP controls him and Bihar lacks jobs.
Web Summary : राहुल गांधी के इस दावे से कि 10% भारतीय सेना को नियंत्रित करते हैं, बिहार में विवाद छिड़ गया। भाजपा ने उनके बयान को विभाजनकारी और सेना विरोधी बताया। गांधी ने नीतीश कुमार पर भी हमला बोला, आरोप लगाया कि भाजपा उन्हें नियंत्रित करती है और बिहार में नौकरियों की कमी है।