शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

८ आधार, ८ लायसन्स, १६ मतदार कार्ड आणि... व्यक्तीकडे सापडला बनावट कागदपत्रांचा खजिना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:57 IST

Bihar Crime News: बिहारमधील भारत-नेपाळ सीमेजवळून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील घोडासहन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर कॅफे चालवणाऱ्या भूषण चौधरी याच्या मालमत्तांवर पोलिसांनी टाकलेल्या धाडींमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बिहारमधील भारत-नेपाळ सीमेजवळून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील घोडासहन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर कॅफे चालवणाऱ्या भूषण चौधरी याच्या मालमत्तांवर पोलिसांनी टाकलेल्या धाडींमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून विविध देशांचं चलन, पासबूक, परदेशी घड्याळ, ८ आधारकार्ड,८ ड्रायव्हिंग लायसन्स आणि १६ मतदार ओळखपत्र सापडली आहेत. याशिवाय सहा श्रम कार्ड आणि ४ बँक पासबुक, एक चेकबूक आणि ९ स्कॅनर जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. 

दरम्यान, भूषण चौधरी याचा मुलगा गोलू चौधरी याला उत्तर प्रदेश पोलिसांनी आधीच अटक केल्याची माहिती समोर आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं आहे. गोलू हा दहशतवादी फंडिगशी संबंधित कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्यानंतर गोलू याला आपल्यासोबत नेऊन अधिक चौकशी सुरू केली आहे. तसेच मोतिहारी पोलिसांनीही फंडिंगच्या नेटवर्कचा तपास करण्यासाठी त्याला रिमांडवर घेण्याची तयारी सुरू केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड आलोक कुमार नावाची व्यक्ती आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तोच हे संपूर्ण नेटवर्क चालवायचा असे बोलले जात आहे. तसेच नेपाळसोबतची सीमा खुली असल्याने येथून तस्करी, बनावट नोटा आणि दहशतवादी फंडिंगसारखे प्रकार समोर आले आहेत. नेपाळमार्गे जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांसाठी फंडिंग चॅनेल  सुरू केले जात आहेत, असा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी