शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चार जिगरी मित्रांनी उचलले टोकाचे पाऊल; विष प्यायल्याने तिघांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 18:18 IST

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सहरसा : बिहारच्या सहरसा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चार घनिष्ठ मित्रांनी एकत्रितपणे कीटकनाशक औषध प्राशन केले. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

घटना कुठे आणि कशी घडली?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील कनेरिया पोलीस ठाणे हद्दीतील फरेवा मुसहरी गावात ही घटना घडली. चार मित्रांनी शनिवारी खत विक्रीच्या दुकानातून कीटकनाशक औषध खरेदी केले. त्यानंतर गावाबाहेरील मक्याच्या शेतात जाऊन एकत्पणे एक औषध प्राशन केले.

या घटनेत राजा कुमार (वय २०), सनी देओल (वय १८) आणि एका अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाला, तर चौथा अल्पवयीन तरुण गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

उपचारादरम्यान मृत्यू

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी सर्वांना तातडीने खगडिया येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्रथम राजा कुमार आणि सनी देओल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळाने आणखी एका अल्पवयीन तरुणाने प्राण सोडले. चौथा तरुण अद्यापही गंभीर अवस्थेत आहे. चौघांनी असा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच कनेरिया पोलीस ठाण्याचे अधिकारी पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. घटनास्थळी FSL (फॉरेन्सिक सायन्स लॅब) पथकालाही बोलावण्यात आले. पोलिसांनी त्या ठिकाणाची पाहणी केली असून, कीटकनाशकाचे नमुने आणि प्लास्टिकचे ग्लास जप्त करण्यात आले आहेत. या सामूहिक आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. चौथ्या मित्राचा जीव वाचला, तर तो कारण सांगू शकेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Four close friends drank poison, three dead, one critical; reason unclear.

Web Summary : In Bihar, four friends consumed pesticide; three died, one is critical. They bought the poison at a shop. Police are investigating the tragic incident in Saharsa, but the motive remains unknown.
टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी