शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

वाढदिवशी नितीश कुमारांनी पूर्ण केलं आश्वासन, खासगी रुग्णालयांतही मोफत मिळणार कोरोना लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 13:24 IST

आजपासून संपूर्ण देशातील खासगी रुग्णालयांत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना तसेच 45 वर्षांवरील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना लस देण्यात येणार आहे. (Bihar corona vaccine to be free of cost in private hospitals)

ठळक मुद्देआजपासून खासगी रुग्णालयांतून देण्यात येणाऱ्या कोरोना लशीचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल, असे बिहार सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांत लशीच्या प्रत्येक डोसची किंमत जास्तीत जास्त 250 रुपये ठेवली आहे

पाटणा -नितीश कुमार सरकार, बिहार (Bihar ) विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला दिलेले मोफत कोरोना लशीचे (corona vaccine) आश्वास पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. आजपासून खासगी रुग्णालयांतून देण्यात येणाऱ्या कोरोना लशीचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल, असे बिहार सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Bihar corona vaccine to be free of cost in private hospitals Nitish kumar goverment fulfills their promise)

आजपासून संपूर्ण देशातील खासगी रुग्णालयांत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना तसेच 45 वर्षांवरील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांत लशीच्या प्रत्येक डोसची किंमत जास्तीत जास्त 250 रुपये ठेवली आहे. मात्र, बिहारमध्ये ही लस लोकांना मोफत टोचली जाणार आहे. आपण पुन्हा सत्तेत आलो, तर बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनालस मोफत दिली जाईल, असे आश्वासन भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात दिले होते.

आता चीननंही दिली 'सिंगल डोस' कोरोना लशीला मंजुरी, जॉन्सन अँड जॉन्सनला टक्कर देण्याचा प्रयत्न

याच पार्श्वभूमीवर सरकार स्थापन झाल्यानंतर नितीश कॅबिनेटने बिहारमधील प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस दिली जाण्यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली होती. 

नितीश कुमारही घेणार कोरोना लस -देशभरात आज लसिकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. मुख्यमंत्री नितीश कुमारही आज कोरोना लशीचा पहिला डोस घेतली. नितीश कुमार सोमवारी 1:00 वाजता आयजीआयएमएस रुग्णालयात जाऊन तेथे लसिकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करतील. यावेळी ते स्वतःही लस घेतील. आज नितीश कुमारांचा वाढदिवसही आहे आणि याच दिवशी त्यांनी बिहारमधील जनतेला मोठी भेट दिली आहे.

अमेरिकेनं भारताकडून घेतलंय 216 अब्ज डॉलरच कर्ज, प्रत्येक नागरिकाच्या डोक्याव लाखोंच ऋण

मोदींनीही घेतली कोरोना लस -देशात आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे. 

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, "एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केले, ते कौतुकास्पद आहे." तसेच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत भारत कोरोनामुक्त बनवूयात, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. 

कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नर्सला म्हणाले...

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहार