शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं 3 जणांना मारली ठोकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 13:34 IST

बिहारमधील काँग्रेसच्या दबंग खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं आज 3 जणांना उडवलं आहे.

बिहार, दि. 21 - बिहारमधील काँग्रेसच्या दबंग खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं आज 3 जणांना उडवलं आहे. सुपोलमधील निर्मली-सिकर्ता या रस्त्यावर हा अपघात झाला आहे, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे. निर्मली शहराध्यक्ष रामप्रकाश यादवही उपस्थित होते. जखमींना निर्मलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अपघातातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. रणजित रंजन हे जन अधिकारी पक्षाचे नेते पप्पू यादव यांच्या पत्नी आहेत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन आपल्या हार्ले डेव्हिडसन बाईकवरून संसदेच्या आवारात आल्या होत्या, तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांचीही काही काळ धावपळच उडाली होती. संसदेत बाईक घेऊन यायची परवानगी नसताना, निळ्या रंगाचा सूट, डोक्यावर हेल्मेट आणि डोळ्यावर गॉगल असलेल्या 42 वर्षीय रणजित रंजन बाईकवरून आल्या होत्या, तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्यांना ओळखलेच नाही. मात्र लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संमती दिल्याने त्या बाईक थेट आवाराच्या आत घेऊन गेल्या होत्या.आपण बाईकच काय, अनेकदा सायकलही चालवतो, असे रणजित रंजन यांनी पत्रकारांना सांगितले होते. आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर कधीच कोणतीही बंधने आणली नाहीत, हे त्यांनी आवर्जून सांगितले होते. खा. रंजन या दोन मुलांची आई आहेत. बिहारमधला वादग्रस्त नेता पप्पू यादवच्या त्या पत्नी आहेत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी पप्पू यादव यांनी जम्मू व काश्मीरमध्ये भारताचा झेंडा जाळण्यात गैर ते काय असा प्रश्न विचारून नवा वाद निर्माण केला होता. यादव यांच्या या टिप्पणीवर भाजपाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या पप्पू यादव यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून स्वत:चा पक्ष, राष्ट्रीय जनता दलात प्रवेश, भाजपाशी जवळीक, पत्नी काँग्रेसची खासदार असा सर्वपक्षीय संचार असलेले ते नेते आहेत. सगळे हिंदू संत राष्ट्रविरोधी असल्याचे विधानही त्यांनी याच भरात केले असून अशा संतांपासून पिळवणूक होऊ द्यायची नसेल तर मंदिरांमध्ये जाऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला होता.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी