शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

बिहार : नितीश कुमार लखपती, तर मुलगा कोट्यधीश; मंत्र्यांनी जाहीर केली संपत्ती

By जयदीप दाभोळकर | Published: January 01, 2021 3:23 PM

Bihar : बिहारच्या मुख्यमंत्र्यांसहित सर्व मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली मालमत्तेची माहिती.

ठळक मुद्देनितीश कुमार यांच्यापेक्षा त्यांच्या मुलाकडे अधिक संपत्तीनितीश कुमार यांच्याकडे केवळ ३५ हजारांची रोख रक्कम

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून एकूण ५७ लाखांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. तर संपत्तीच्या तुलनेत त्यांच्या मुलाकडे म्हणजेच निशांत यांच्याकडे आपल्या वडिलांपेक्षा अधिक संपत्ती आहे. ३१ डिसेंबर रोजी नितीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे केवळ ३५ हजार रूपये रोख रकमेच्या स्वरूपात आहे. तर निशांत यांच्याकडे २८ हजार रूपये रोख आहेत. परंतु वडिलोपार्जित संपत्तींमुळे निशांत यांच्याकडे आपल्या वडिलांपेक्षा अधिक श्रीमंत आहेत. बिहार मंत्रिमंडळाच्या विभागानं आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या संपत्तीच्या माहितीनुसार निशांत यांच्याकडे निरनिराळ्या बँकांमध्ये एक कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम आणि फिक्स्ड डिपॉझिट आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्याकडे फिक्स्ड डिपॉझिटही नाही. नितीश कुमार यांच्याकडे ११ लाख ३२ हजार रूपये किंमतीची एक फोर्ड कार आहे. तर त्यांच्या मुलाकडे ६.४० लाख किंमतीची एक ह्युंदाई कंपनीची गाडी आहे. निशांत यांच्याकडे आपल्या वडिलांकडे असलेल्या दागिन्यांपेक्षा अधिक दागिनेही आहेत. नितीश कुमार यांच्याकडे केवल एक सोन्याची अंगठी आणि एक चांदीची अंगठी आहे. या दागिन्यांची किंमत ९८ हजार रूपये इतकी आहे. तर निशांत यांच्याकडे तब्बल ३० तोळे सोनं आणि अन्य दागिनेही असून त्यांची किंमत २०.७३ लाख इतकी आहे. याव्यतिरिक्त नितीश कुमार यांच्याकडे एक एसी, एक कंम्प्युटर, १२ गाय, ६ वासरं, व्यायामाची सायकल, शिवणकामाचं मशीन आणि एक मायक्रोव्हेव ओव्हनही आहे. तसंच त्यांचं दिल्लीतही एक घर असल्याचं देण्यात आलेल्या माहितीत नमूद केलं आहे. २०१८ च्या तुलनेत यावेळी त्यांच्याकडे रोख रक्कम कमी झाल्याचं दिसून येत आहे. २०१८ मध्ये त्यांच्याकडे ४२ हजार रूपये रोख होते. २०२० मध्ये त्यांच्याकडे ३५ हजार रूपये रोख असल्याचं सांगण्यात आलं आहे.  

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार