शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

बिहारमध्ये घड्याळाचा गजर वाजलाच नाही, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 15:57 IST

बिहार निवडणुकांत सद्यपरिस्थितीनुसार (दुपारी 3.00 वाजता) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आज मतमोजणीचे कल समोर येऊ लागल्यापासून या सुरुवातीच्या कलांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए 130 तर महाआघाडी 102 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीला बिहार निवडणुकांत नोटापेक्षाही कमी मतदान झाले आहे.  बिहार निवडणुकांत सद्यपरिस्थितीनुसार (दुपारी 3.00 वाजता) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे. कारण, शिवसेना आणि राष्ट्रवादीला अद्याप एकाही जागेवर आघाडी घेत आली नाही. शिवसेनेनं उभा केलेल्या 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेने 50 उमेदवार देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात 23 जागांवरच निवडणूक लढवली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनंही स्वतंत्रपणे बिहार निवडणुका लढवल्या होत्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये, शरद पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख स्टार प्रचारक होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांनी बिहारमध्ये प्रचारसभा घेतल्या नसल्याचं सांगण्यात येतं.  

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवाडीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला 0.22 टक्के मतं मिळाली आहेत. तर, शिवसेनेला 0.05 टक्के मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांच्या मतांपैकी नोटाला पडलेली मतं अधिक आहेत. विधानसभा निवडणुकीत 1.74 टक्के नागरिकांनी नोटाला पसंती दिली आहे. नोटाला एकूण 3 लाख 18 हजार 34 मते मिळाली आहेत. तर एमआयएमला 1.08 टक्के मते मिळाली असून त्यांचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दर्शविणाऱ्या आघाडी आणि पिछाडीच्या आकडेवारीत राष्ट्रवादीचा एकही उमेदवार दिसून येत नाही. यावरुन राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर वाजलाच नाही, असे म्हणता येईल. 

2015 मध्ये शिवसेनेनं लढवल्या 80 जागा

सन 2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 243 जागांपैकी 80 जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडणूक आला नाही. मात्र, शिवसेनेला एकूण 2 लाख 11 हजार 131 मते मिळाली होती. त्यात हयाघाट, बोचहा, दिनारा जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब आणि मोरवा या सात विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. विशेष म्हणजे एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही अधिक मते मिळाली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेलाही ‘नोटा’पेक्षाही अधिक मतदान झालं नाही. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवार