शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

बिहारमध्ये माओवादी आणि सुरक्षा दलांत चकमक, झोनल कमांडरसह तीन माओवादी ठार

By बाळकृष्ण परब | Updated: November 22, 2020 12:57 IST

Bihar News : बिहारमधील गया येथे सुरक्षा दले आणि माओवाद्यांदरम्यान, शनिवारी रात्री मोठी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या झोनल कमांडरसह तीन माओवाद्यांना ठार केले.

गया - बिहारमधील गया येथे सुरक्षा दले आणि माओवाद्यांदरम्यान, शनिवारी रात्री मोठी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या झोनल कमांडरसह तीन माओवाद्यांना ठार केले. गया येथील बाराचट्टी जंगल परिसरात केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची कोब्रा बटालियन आणि बिहार पोलिसांच्या शोधमोहिमेदरम्यान माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आमनासामना झाला.रात्री १२ वाजून २० मिनिटांपासून दोन्हीकडून गोळीबारास सुरुवात झाली. या चकमकीत माओवाद्यांच्या झोनल कमांडरसह तिघे माओवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेल्या कमांडरचे नाव आलोक यादव असल्याचे समोर आले आहे. या माओवाद्यांकडून एक एके-४७ आणि एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या चकमकीनंतर शोधमोहीम सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी एक सामुदायिक भवन डायनामाइट लावून उडवले होते. आपला प्रभाव दर्शवण्यासाठी नक्षलवाद्यांकडून सामुदायिक भवन उडवण्यात आल्याचे समोर आले होते. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेण्यापूर्वी हा हल्ला घडवून आणण्यात आला होता.१५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता बोधीबिगरा गावात नक्षलवाद्यांनी सामुदायिक भवन आयईईडी लावून उद्ध्वस्त केले होते. सामुदायिक भवन उद्ध्वस्त केल्यानंतर माओवाद्यांनी तिथे दोन आयईडी सोडले होते. तसेच एक पत्रकसुद्धा सोडण्यात आले होते. त्यामध्ये भाजपा आणि एनडीए सरकार उलथवण्याचा इशारा देण्यात आला होता.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीBiharबिहार