शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

देशात कधीही लोकसभेच्या निवडणुका लागू शकतात; विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 13:18 IST

Lok Sabha Elections : सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकीची तयारी केली आहे. 

Lok Sabha Elections 2024 Date : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आता एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्ष संभाव्य उमेदवारांची चाचपणी करत आहेत. अशातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात बोलताना लवकरच निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले. "अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. निवडणुका कधी होणार हे कोणालाच माहिती नाही", असे त्यांनी म्हटले.

"देशात याच वर्षी लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. देशात कधी निवडणुका होतील, कोणालाच माहिती नाही. पण परिस्थिती जशी बनली आहे, त्यावरून असे दिसते की त्या कधीही होऊ शकतात", असेही नितीश कुमार यांनी सांगितले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. खरं तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य नुकतेच समोर आले आहे.

स्टॅलिन यांनी केला होता दावा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी लोकसभेच्या निवडणुकीबद्दल एक मोठा दावा केला होता. "कर्नाटकातील पराभवानंतर भाजप लोकसभा निवडणुकीची घोषणा आधी करू शकते. देशभरात भाजपचा प्रभाव कमी होत चालला आहे", असे एमके स्टॅलिन यांनी १० जून रोजी म्हटले होते. अलीकडेच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवत भाजपला सत्तेतून बाहेर केले. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी हा निकाल म्हणजे देशाचा मूड बदलण्याचा जनादेश असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, चालू वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोरम या राज्यांचा समावेश आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. दुसरीकडे, तेलंगणामध्ये मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसमोर कॉंग्रेस मुख्य प्रतिस्पर्धी असणार आहे. मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व आहे, त्यामुळे तिथे काँग्रेस आणि भाजपच्या जनादेशाचा फारसा परिणाम होणार नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारlok sabhaलोकसभाTamilnaduतामिळनाडूBJPभाजपा