बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडी जाळली

By Admin | Updated: May 26, 2016 13:06 IST2016-05-26T13:06:16+5:302016-05-26T13:06:16+5:30

बिहारच्या गया जिल्ह्यात डुमरीया येथे गुरुवारी सकाळी बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला करण्यात आला.

The Bihar Chief Minister attacked the convoy, burnt the car | बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडी जाळली

बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडी जाळली

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. २६ - बिहारच्या गया जिल्ह्यात डुमरीया येथे गुरुवारी सकाळी बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला करण्यात आला. संतप्त जमावाने मांझी याच्या ताफ्यावर दगडफेक केली आणि नंतर त्यांच्या ताफ्यातील एक गाडीला आग लावली. पोलिसांच्या दोन बाईकही जमावाने जाळल्या. सुदैवाने माझी या हल्ल्यातून बचावले. 
 
जीतन राम मांझी सुदेश पासवान आणि सुनील पासवान या बंधुंच्या निधनाबद्दल शोक प्रकट करण्यासाठी चालले होते. त्यांना पुढे जाऊ नये असे सांगण्यात आले होते. मात्र तरीही त्यांनी त्या इशा-याकजे दुर्लक्ष केले. पंचायत निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान बुधवारी दोन पासवान बंधुंची हत्या करण्यात आली. 
 
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. दुमरियामधील परिस्थिती तणावपूर्ण असून, तेथे मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आहे. 
 

Web Title: The Bihar Chief Minister attacked the convoy, burnt the car