शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

Bihar Black Fungus Death: कोरोनानंतर बिहारमध्ये ब्लॅक फंगसमुळे हाहाकार; २४ तासांत १२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 12:14 PM

Bihar Black Fungus Death: बिहारमध्ये ब्लॅक फंगसच्या वाढत्या घटनांमुळे त्याला महासाथ घोषित करण्यात आलं. २४ तासांत कोरोनापेक्षाही अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल.

ठळक मुद्देबिहारमध्ये ब्लॅक फंगसच्या वाढत्या घटनांमुळे त्याला महासाथ घोषित करण्यात आलं. २४ तासांत कोरोनापेक्षाही अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी लागू केलेल्या निर्बंधांनंतर यावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. असं असलं तरी आता ब्लॅग फंगसनं अनेकांच्या चिंता वाढवल्या आहे. बिहारमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं. परंतु असं असतानाच आता ब्लॅक फंगस या आजारानं प्रशासनासमोरच्या चिंता वाढवल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत बिहारमध्ये कोरोनापेक्षाही अधिक ब्लॅक फंगसच्या आजाराच्या रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रूग्णांची संख्या चारशेच्या जवळपास पोहोचली आहे. त्याच वेळी, गेल्या २४ तासांत ब्लॅक फंगसमुळे १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत ब्लॅक फंगसचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं ब्लॅक फंगससाठी असलेल्या बेड्सची संख्या वाढवली आहे.महासाथ म्हणून घोषणाबिहारमध्ये ब्लॅक फंगसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने शनिवारी याला महासाथ म्हणून घोषित केलं होतं. "मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सूचनेनुसार एपिडमिक डिजिज अॅक्ट अंतर्गत ब्लॅक फंगस अधिसूचित करण्यात आलं आहे," अशी माहिती आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी दिली. याअंतर्गत आरोग्य विभागाकडून अनेक सूचना देण्यात आल्या असल्याचे मंगल पांडे म्हणाले होते.सर्व खासगी आणि सरकारी संस्थांकडून म्युकरमायकोसिसच्या (ब्लॅक फंगस) सर्व संदिग्ध आणि प्रमाणित रुग्णांना जिल्ह्यातील सिव्हिल सर्जनच्या माध्यमातून एकीकृत रोग निवारण कार्यक्रम, आरोग्य विभागाला सूचित केलं जाणार आहे. 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतBiharबिहारHealthआरोग्य