बिहारमधील पाटणा जवळील बिहटा परिसरात एक अत्यंत भीषण रस्ता अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ऑटो आणि एका अवजड ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटोमधील ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मृत व्यक्ती आरा येथील रहिवासी होते. मनेर येथून सर्वजण आपल्या घरी परतत असताना हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपासाला सुरुवात केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बिहटा परिसरात अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही. शनिवारी देखील 'नो एन्ट्री' असलेल्या मार्गावर एका वाळूने भरलेल्या हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडलं होतं, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या याच ट्रकने दानापूरचे डीएसपी २ अमरेंद्र कुमार झा यांच्या गाडीलाही जोरदार धडक दिली. या घटनेत डीएसपी आणि त्यांचे अंगरक्षक थोडक्यात बचावले, मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. स्थानिक रहिवासी रणवीर कुमार यांनी वाहतूक पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या संगनमतानेच हे अपघात होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. "पोलीस ३०० ते ५०० रुपये घेऊन अवजड ट्रकांना नो एन्ट्री असलेल्या रस्त्यांवर प्रवेश देऊ देत आहेत," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी वाळूचा ट्रक जप्त केला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Web Summary : A horrific auto-truck collision near Patna, Bihar, killed six and critically injured two. The victims were residents of Ara, returning home from Maner. Locals allege police corruption allows heavy trucks on restricted roads, causing accidents. Investigation underway.
Web Summary : बिहार के पटना के पास एक भीषण ऑटो-ट्रक टक्कर में छह लोगों की मौत हो गई और दो गंभीर रूप से घायल हो गए। पीड़ित आरा के रहने वाले थे, जो मनेर से घर लौट रहे थे। स्थानीय लोगों का आरोप है कि पुलिस भ्रष्टाचार के कारण भारी ट्रक प्रतिबंधित सड़कों पर चलते हैं, जिससे दुर्घटनाएं होती हैं। जांच जारी है।