सौरऊर्जा निर्मितीत बिहार मागास, देशात एकूण ५००० मेगावॅट विजनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 17:12 IST2016-01-15T16:48:44+5:302016-01-15T17:12:43+5:30
भारतातील सौरऊर्जा वापरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी यामध्ये बिहारचं नाव कुठेच नाही. आज ऊर्जा मंत्राल्याने जाहीर केलेल्या भारतातील २६ राज्याच्या यादीत बिहारचे नाव नाही.

सौरऊर्जा निर्मितीत बिहार मागास, देशात एकूण ५००० मेगावॅट विजनिर्मिती
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - भारतातील सौरऊर्जा वापरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी यामध्ये बिहारचं नाव कुठेच नाही. आज ऊर्जा मंत्राल्याने जाहीर केलेल्या भारतातील २६ राज्याच्या यादीत बिहारचे नाव नाही.
बिहार मध्ये सौरऊर्जा वीज उत्पन्न होत नाही. आज ऊर्जा मंत्राल्याने सौर ऊर्जा उत्पन्न करणाऱ्या जाहीर केलेल्या २६ राज्यामध्ये राज्यस्थान सर्वात अग्रेसर असून २०१५ मध्ये १२६४ मेगावॅट सौरउर्जा निर्माण केली आहे. तर गुजरात १०२४, मध्यप्रदेश ६७९, तमिळनाडू ४१९ यांचा क्रमांक लागतो. मागील वर्षी भारतात सौरउर्जेवर एकूण ५,१३० मेगावॅट विजेची निर्मीती करण्यात आली आहे. ती गेल्या वर्षाच्या तुलनेत १३८५ मेगावॅट ने वाढली आहे.
भारत सरकार वर्ष २०२१-२२ पर्यंत राष्ट्रीय उर्जा मिशन मार्फत १०० गीगावॅट सौरऊर्जा निर्माण करणार आहे. त्यामधील ६० गीगावॅट जमानीवर तर ४० गीगावॅट घराच्या छतावर उत्पन्न करणार आहे. सरकारचे चालू वर्षी २०१६ मध्ये २००० मेगावॅट तर पुढील वर्षी १२००० मेगावॅट सौरऊर्जा निर्मीती करण्याचे लक्ष आहे. ऊर्जा मंत्रालय ३१ मार्च पर्यंत १८०० मेगावॅट निर्मितीचा निवीदा काढणार आहे.