शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 15:08 IST

दिल्लीमध्ये नवीन सरकारच्या स्थापनेपूर्वीच बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे.

Bihar Politics : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या बिहार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे. 2025 ची विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आज बिहार भाजपची बैठक पार पडली, या बैठकीनंतर सम्राट चौधरी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले की, बिहारमध्ये जनतेने आम्हाला 75 टक्के जागा जिंकून दिल्या आहेत. आमच्या कार्यक्षम निवडणूक व्यवस्थापनाचा हा परिणाम आहे. आम्हाला आमच्या एनडीएतील नेत्यांबद्दल कोणतीही शंका नाही. काही लोकांना मागच्या दाराने, चोर दरवाजाने आत यायचे आहे. त्यांचे लोक संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली 1996 पासून बिहारमध्ये निवडणूक लढवत आहोत आणि पुढेही लढवू.

दरम्यान, बुधवारी जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि मंत्री डॉ. विजय कुमार चौधरी यांनीदेखील स्पष्ट केले होते की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी 2025 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. 2025 च्या निवडणुका बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जातील. आता भाजपच्या सम्राट चौधरी यांनीदेखील यावर शिक्कामोर्तब केला. 

नितीश-चंद्राबाबू किंगमेकरलोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू किंगमेकर म्हणून समोर आले आहेत. एनडीएला 543 पैकी 293 जागा मिळाल्या, तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळू शकल्या. भाजपला 240 जागा मिळाल्या, परंतु 272 च्या जादुई आकड्याला स्पर्श करू शकले नाही. आता एनडी सरकार तेलुगु देसम पार्टी आणि जनता दल (युनायटेड) वर अवलंबून आहे. नितीश यांच्या पक्षाला 12 जागा मिळाल्या आहेत, तर टीडीपी 16 जागांसह दोन नंबरचा पक्ष बनला आहे.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक 2024