शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:38 IST

बिहारमध्ये एकूण २४३ विधानसभेच्या जागा आहेत आणि या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, २४३ विधानसभा जागांपैकी जेडीयू आणि भाजप जवळजवळ समान जागांवर निवडणूक लढवतील. यात जेडीयूला १०२ ते १०३ आणि भाजपला १०१ ते १०२ जागा देण्याचे ठरले आहे. याशिवाय, एनडीएचे इतर मित्रपक्ष, चिराग पासवान यांच्या एलजेपी (रामविलास), जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवम मोर्चा (एचएएम) आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला किती जागा द्यायच्या यासंदर्भातही फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

महत्वाचे म्हणजे, यासंदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने एनडीएमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे म्हटले आहे. यात नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि भाजपला समान जागा मिळणे अपेक्षित आहे. चिराग यांच्या एलजेपी (आर) चे बिहारमध्ये ५ खासदार आहेत, त्यांना २५-२८ जागा मिळू शकतात, तर ४० जागांचा दावा करणाऱ्या जीतन मांझी यांच्या एचएएमला ६-७ जागा मिळू शकतात. २०२० च्या निवडणुकीतही पक्षाने ७ जागांवर निवडणूक लढवली आणि ४ जागा जिंकल्या होत्या. तसेच, उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमला ४-५ जागा देण्याचे ठरले आहे.

या जागावाटपांअंतर्गत, एनडीएमधील घटक पक्षांना साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या फॉर्म्युल्यानुसार, जागावाटप निश्चित मानले जाते परंतु त्याची अंतिम घोषणा अद्याप झालेली नाही. जर आपण २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीबद्दल बोललो तर, त्यावेळी एनडीएमध्ये जेडीयू, भाजप, एचएएम आणि मुकेश साहनी यांचे व्हीआयपी यांचा समावेश होता. त्यानंतर भाजपने ११०, जेडीयू ११५, एचएएम ७ आणि साहनी यांच्या पक्षाने ११ जागांवर निवडणूक लढवली. ज्यामध्ये भाजपने सर्वाधिक ७४ जागा जिंकल्या, जेडीयूने ४३, एचएएमने ४ आणि व्हीआयपीनेही ४ जागा जिंकल्या होत्या. याशिवाय, चिराग यांचा लोजपा (आर) स्वतंत्रपणे निवडणूक लढला होता. तर उपेंद्र कुशवाहच्या पक्षाने तिसरी आघाडी स्थापन केली. ज्यामध्ये बसपा, ओवेसीचा एआयएमआयएम यांचा समावेश होता. ज्यामध्ये कुशवाहाच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही, एलजेपी (आर) ला एक जागा मिळाली, तर एआयएमआयएमने २० जागांवर निवडणूक लढवली आणि ५ जागा जिंकल्या. बिहारमध्ये एकूण २४३ विधानसभेच्या जागा आहेत आणि या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024BJPभाजपाPoliticsराजकारण