लालूजींना आपल्या मुलाला (तेजस्वी यादव) मुख्यमंत्री बनवायचे आहे. तर सोनिया गांधींची आपल्या मुलाला (राहुल गांधी) पंतप्रधान बनवण्याची इच्छा आहे. पण बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद खाली नाही आणि दिल्लीत पंतप्रधानपदही खाली नाही. मी दोघांनाही स्पष्टपणे सांगू इच्छितो, आता तुमच्या मुलांचा नंबर लागणार नाही, अशी भविष्यवाणी करत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मंगळवारी बेगूसराय येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.
राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांना आदरांजली अर्पण करत शहा यांनी भाषणाची सुरुवात केली आणि लालू-राबडी यांच्यावर 'जंगलराज' म्हणत निशाणा साधला. ते म्हणाले, लालू-राबडी यांचे शासन पुन्हा एका नवीन रूपात परतण्याचा प्रयत्न करत आहे. कधीकाळी औद्योगिक जिल्हा असलेला बेगूसराय त्यांच्या राजवटीत गुन्हेगारी आणि अपहरणाचे केंद्र बनला होता. यावेळी, काँग्रेस आणि आरजेडी मतपेटीच्या राजकारणासाठी घुसखोरांचे रक्षक बनले आहेत, असा आरोपही शाह यांनी केला. तसेच, भाजप प्रत्येक घुसखोराला शोधून बाहेर काढेल, असे आश्वासनही दिले.
भ्रष्टाचार आणि राम मंदिरअमित शहा यांनी काँग्रेस आणि आरजेडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ते म्हणाले, "लालू-राबडी राजवटीत चारा घोटाळा, पूर मदत घोटाळा, हॉटेल घोटाळा, प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाला. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या उभारणीचे श्रेय पंतप्रधान मोदींना दिले. गेल्या ७० वर्षांपर्यंत काँग्रेसने काही केले नाही, पण आज अयोध्येत भव्य राम मंदिर उभे आहे, हे मोदीजींमुळेच शक्य झाले, असे शाह म्हणाले.
दरम्यान, जनतेला एनडीएच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत, बिहारचे भले नक्सलवाद आणि भ्रष्टाचार पसरवणाऱ्यांकडून होणार नाही. बिहारचे भले केवळ मोदी आणि नितीश बाबूच करू शकतात, असेही शाह यावेळी म्हणाले.
Web Summary : Amit Shah predicts no CM or PM post for Lalu and Sonia Gandhi's sons. He criticizes RJD-Congress for corruption and appeasement politics during a Bihar rally, promising to expel infiltrators. Shah credits Modi for the Ram Temple's construction, urging support for NDA to combat corruption and Naxalism.
Web Summary : अमित शाह ने भविष्यवाणी की कि लालू और सोनिया गांधी के बेटों के लिए कोई CM या PM पद नहीं है। उन्होंने बिहार रैली में RJD-कांग्रेस की भ्रष्टाचार और तुष्टीकरण की राजनीति की आलोचना की, घुसपैठियों को निष्कासित करने का वादा किया। शाह ने राम मंदिर के निर्माण का श्रेय मोदी को दिया और भ्रष्टाचार व नक्सलवाद से लड़ने के लिए NDA का समर्थन करने का आग्रह किया।