शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Bihar Assembly Election 2020: ‘बेरोजगार बिहारी’ नितीशकुमारांची दुखती नस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 02:34 IST

Bihar Assembly Election 2020: निवडणुकीत रोजगार कळीचा मुद्दा : व्यवसाय, नोकरीवर जास्त चर्चा

- असीफ कुरणे कोल्हापूर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत यावेळी जातीधर्माच्या मुद्द्यांप्रमाणेच बेरोजगारी कळीचा मुद्दा बनण्याची चिन्हे आहेत. कोरोनाचे लॉकडाऊन, देशाची विसकटलेली आर्थिक घडी, यामुळे लाखो बिहारी युवक सध्या राज्यात परतले आहेत. इतर वेळी फक्त निवडणूक व सणासुदीला येणारे हे युवक यावेळी घरात बसून आहेत. त्यांच्यातील संतापाचा फटका नेमका कोणाला व किती बसणार यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या नितीशकुमार यांनी राज्यात रोजगारवाढीसाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. त्यामुळे राज्यात बेरोजगारीचा दर ४६ टक्क्यांवर गेलेला असून, देशात तो सर्वाधिक आहे. असा आरोप करीत राजद, काँग्रेसने या तरुण मतदारांना आकर्षित करण्यावर भर दिलेला आहे. तेजस्वी यादव यांनी बेरोजगारी हटाव यात्रेची हाक देऊन निवडणुकीत आपला भर कशावर असेल हे दाखवून दिले होते. राज्यात ४ लाख ५० हजार सरकारी जागा रिक्त आहेत. बेरोजगारांसाठी सुरू केलेल्या संकेतस्थळावर ५ लाख अर्ज आले असून, जवळपास १० लाख बेरोजगारांनी मिस कॉल देऊन आपली नोंदणी केली असल्याचे राजदचे संजय यादव यांनी माध्यमांना सांगितले. नितीश कुमार हेदेखील युवा शक्ती बिहार की प्रगती, कौशलविकासच्या माध्यमातून युवकांना रोजगाराचे आश्वासन देत आहेत.१० लाख नोकऱ्या देणारमहागठबंधनचे सरकार आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत राज्य सरकारच्या रिक्त असलेल्या जागा भरत १० लाख युवकांना नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रीय जनता दलाचे नेते व महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी दिले आहे.जामीन मिळूनही लालूप्रसाद तुुरुंगातचरांची (झारखंड) : चारा घोटाळ्यातील चैबसा कोषागाराशी संबंधित खटल्यात राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. यादव यांना या खटल्यात सुनावल्या गेलेल्या पाच वर्षे तुरुंगवासापैकी निम्मी शिक्षा त्यांंनी भोगली असल्यामुळे हा जामीन मंजूर झाला. हा जामीन मंजूर झाला तरी यादव दुमका कोषागाराशी संबंधित प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत असल्यामुळे तुरुंगातच राहतील. या कोषागारात त्यांनी सुमारे ३.१३ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडUnemploymentबेरोजगारी