शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Bihar Assembly Election 2020: बिहारमधील रालोआमधून पासवान यांच्या पक्षाची गच्छंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:44 IST

Bihar Assembly Election 2020: नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवणार -भाजप

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा जनता दल (यू) १२२ जागांवर तर भाजप १२१ ठिकाणी उमेदवार उभे करणार, अशी घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी केली. ही निवडणूक नितीश यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल आणि बिहारच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यापुढे राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पाटीर्ला स्थान राहणार नाही, असे भाजप नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले.खा चिराग पासवान यांनी आपण नितीश कुमार यांच्या सर्व उमेदवारांविरुद्ध आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा पक्ष केंद्रात रालोआमध्ये असून, राम विलास पासवान केंद्रात मंत्रीही आहे. पण खा. चिराग यांनी उघडपणे नितीश यांच्याविरोधी भूमिका घेतल्याने भाजपने बिहारपुरती त्यांच्याशी फारकत घेतली आहे. त्यामुळे पासवान एकटे पडले आहेत. पंतप्रधान मोदी वा भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या नावाने स्वत:च्या उमेदवारांसाठी त्यांनी मते मागू नयेत, असेही भाजपने खा. चिराग यांना बजावले आहे. नितीश यांनी खा. पासवान यांच्याविषयी बोलण्याचे टाळले. ते म्हणाले की राम विलास पासवान हे आपले मित्र आहेत. त्यांची प्रकृती लवकर चांगली होवो, अशी आपली इच्छा आहे. जनता दल (यू) आपल्या वाट्याच्या १२२ पैकी ७ जागा जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम पाटीर्ला सोडणार आहे.भाजपही १२१ पैकी काही जागा मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पाटीर्ला सोडण्यास तयार आहे. त्यासाठी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे.महाआघाडीशी सामनाराज्यात नितीश यांच्या नेतृत्वाखालील रालोआ आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्या सामना होणार आहे. महाआघाडीत काँग्रेस, कम्युनिस्ट आणि अन्य काही पक्ष आहेत.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Nitish Kumarनितीश कुमार