शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!
2
फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं
3
'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक
4
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
5
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
6
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
7
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
8
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
9
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
10
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
11
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
12
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
13
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
14
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
15
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
16
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
17
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
18
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
19
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
20
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये महाआघाडीचे गणित जुळले, RJD, काँग्रेसमध्ये असे जागावाटप ठरले

By बाळकृष्ण परब | Published: October 03, 2020 7:40 PM

Bihar Assembly Election 2020 Marathi News : महाआघाडीच्या नेत्यांना पाटणा येथे पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत माहिती दिली. बिहारमधील महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय, सीपीएम आणि व्हीआयपी या पक्षांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आरजेडी १४४, काँग्रेस आणि डावे पक्ष २९ जागा लढवणार आहेतया महाआघाडीचे नेतृत्व आरजेडीचे नेते तेजस्वी यादव करतीलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बिहारमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे

पाटणा - एकीकडे भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएमधील जागावाटपाचा घोळ आणि एलजेपीची नाराजी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असताना दुसरीकडे आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील जागावाटपाचे गणित सुटले आहे. महाआघाडीमध्ये ठरलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आरजेडी १४४, काँग्रेस आणि डावे पक्ष २९ जागा लढवणार आहेत.महाआघाडीच्या नेत्यांना पाटणा येथे पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत माहिती दिली. यावेळी महाआघाडीमधील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. बिहारमधील महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय, सीपीएम आणि व्हीआयपी या पक्षांचा समावेश आहे.यावेळी काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष अविनाश पांडे यांनी सांगितले की, काही वैचारिक मतभेद असले तरी एक भक्कम आघाडी ज्यामध्ये आरजेडी, काँग्रेस, व्हीआयपी आणि डावे पक्ष एकत्र आले आहेत. २०१५ मध्ये महाआघाडीला जनतेने बहुमत दिले होते. मात्र दुर्दैवाने त्या बहुमताचे अपहरण झाले. नितीश कुमार यांनी धोका दिला आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. आता जनता त्यांना माफ करणार नाही. या महाआघाडीचे नेतृत्व तेजस्वी यादव करतील. तर तेजस्वी यादव म्हणाले की, जर बिहारच्या जनतेने संधी दिली तर मी त्यांच्या मानसन्मानाचे रक्षण करेन. आम्ही बिहारी आहोत. जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. माझा डीएनए शुद्ध आहे. बिहारचे आजचे सरकार हे साठलेले अस्वच्छ पाणी आहे. तर आम्ही वाहत्या नदीचा स्वच्छ आणि शुद्ध प्रवाह आहोत.२०१५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडी आणि जेडीयूने प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. तर काँग्रेसने ४१ जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत महाआघाडीला दणदणीत विजय मिळाला होता. मात्र नितीश कुमार यांनी काही काळानंतर महाआघाडीची साथ सोडत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये प्रवेश केला होता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बिहारमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर दुसऱ्या टप्प्यातील मदतान ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेस